Farmer ID : केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांसाठी फार्मर आयडी (Farmer ID) बंधनकारक करण्यात आला आहे. यात लाखो शेतकरी सहभाग घेत नोंदणी करत आहेत.
शिवाय पीएम किसानसह (PM Kisan) नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी देखील हा फार्मर आयडी अनिवार्य आहे. आज मितीस महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे? कुठला जिल्ह्यात आज दिवसभरात सर्वाधिक नोंदणी झाली ते पाहुयात....
देशभरातील शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी (Farmer ID Registration) करण्याचे काम सुरु आहे. खरीप हंगामाच्या (Kharif Season) तोंडावर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी महत्वपूर्ण ठरणार आहे. परिणामी देशातील लाखो शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविला आहे.
आजमितीस देशात 98 लाख 18 हजार 342 शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे Agri stack या संकेतस्थळावर दिसून येते. यापॆकी 80 लाख 15 हजार 714 शेतकऱ्यांची फार्मर आयडी अप्रूव्ह करण्यात आले आहे.
तर महाराष्ट्रातील स्थिती पाहता फार्मर आयडीची नोंदणी संख्या वाढते आहे. आज दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात ४५७ शेतकऱ्यांची नोंदणी, लातूर जिल्हा ३८६, नागपूर जिल्हा ३४३, धाराशिव जिल्हा ३३३, बीड जिल्हा ३०८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर त्याखालोखाल अकोला जिल्हा २७, पालघर जिल्हा १८, वर्धा जिल्हा ११, ठाणे जिल्हा ०४, नंदुरबार जिल्हा ०२ अशी नोंदणी आज दिवसभरात झाली आहे.
शेतकरी ओळखपत्र कसे बनवायचे? सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या https://hrfr.agristack.gov.in/ या संकेतस्थळावर फार्मर आयडी बनवले जात आहेत. याशिवाय, राज्य सरकारे वेगवेगळ्या प्रकारे जागरूकता मोहिमा राबवत आहेत. शेतकरी पंचायत स्तरावर शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी देखील मदत घेऊ शकतात.