Namo Shetkari Yojana : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील हफ्त्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. शासनाने पुढील हफ्त्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
दोनच दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेचा २२ वा हफ्ता पीएम मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. त्यांनतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हफ्त्याची प्रतीक्षा होती. अखेर याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचा (माहे ऑगस्ट २०२५ ते नोव्हेंबर २०२५) लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी १ हजार ७७४ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यामुळे येत्या तीन चार दिवसांत हा हफ्ता देखील वितरित होईल, अशी शक्यता आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, पाचवा हप्ता, सहावा हप्ता तसेच सातवा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. त्यांनतर आता आठवा हफ्ता वितरणासाठी निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे.
जमीन मालकीचा पुरावा नाही, 12 वर्ष जमिनीवर ताबा आहे, मालकी सांगता येते का, काय सांगतो कायदा?
Web Summary : Maharashtra government approves funds for the eighth installment of Namo Shetkari Yojana. ₹1774 crore allocated for eligible farmers. Distribution expected within days, following PM Kisan Yojana disbursement.
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने नमो शेतकरी योजना की आठवीं किस्त के लिए धन मंजूर किया। पात्र किसानों के लिए ₹1774 करोड़ आवंटित। पीएम किसान योजना के वितरण के बाद जल्द ही वितरण होने की उम्मीद है।