Join us
Daily Top 2Weekly Top 5

चांगला भाव मिळण्यासाठी कांद्याची प्रतवारी कशी करावी, 'ही' गोष्ट लक्षात ठेवा, वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 18:35 IST

Kanda Market : कांद्याची प्रतवारी (Onion Grading) ही बाजारपेठेतील मागणी आणि कांद्याच्या आकारानुसार केली जाते.

Onion Grading : कांद्याची प्रतवारी (Onion Grading) ही बाजारपेठेतील मागणी आणि कांद्याच्या आकारानुसार केली जाते. साधारण तीन प्रकारांत कांद्याचे वर्गीकरण केले जाते. उत्तम भावासाठी कांदा स्वच्छ, सुकलेला, आणि इजा न झालेला असावा, याचबरोबर प्रतवारी नेमकी कशी करावी, हे समजून घेऊयात... 

कांदा प्रतवारी

  • पात कापल्यानंतर कांद्याची प्रतवारी करावी. जोडकांदे, डेंगळे आलेले आणि चिंगळी कांदे वेगळे करावे. 
  • राहिलेले कांदे गोळा करून सावलीत ढीग घालावा आणि तो तिथे १० ते १२ दिवस राहू द्यावा. 
  • आपल्या देशात कांद्याची प्रतवारी मजुरांकरवी केली जाते. 
  • सर्वसाधारण विशेष मोठे कांदे (६ सें.मी. व्यास व वरचे), मध्यम (४ ते ६ सें.मी. व्यासाचे) आणि लहान (२ ते ४ सें.मी. व्यासाचे) अशा प्रकारे कांद्याची प्रतवारी केली जाते. 
  • बाजारपेठांच्या आवश्यकतेनुसार प्रतवारी करून कांदा योग्य पॅकिंगमध्ये बाजारात पाठविल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिक चांगला भाव मिळू शकतो. 
  • कांद्याची प्रतवारी मजुरांच्या सहाय्याने करताना अनेक अडचणी येतात. प्रत्येक कांदा हाताळावा लागल्यामुळे खर्च वाढतो. 
  • शिवाय सर्व मजूर एकाच प्रकारे प्रतवारी करतीलच याची खात्री नसते. 
  • अशा परिस्थितीत हाताने किंवा छोट्या मोटारीच्या सहाय्याने चालविता येणाऱ्या सुटसुटीत व शेतकऱ्यांना परवडणाऱ्या प्रतवारी यंत्राची गरज भासते. 
  • या सर्व अडचणींचा विचार करून कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने हस्तचलित तसेच स्वयंचलित कांदा प्रतवारी यंत्र विकसित केले आहे.

- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

 

 

 

 एकाच जमिनीत कांदा लागवड करताय, बुरशी वाढली, उत्पादनात घट झाली, वाचा सविस्तर

 

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Grading Tips: Get the Best Price for Your Crop

Web Summary : To get a good price for onions, grade them by size, ensuring they are clean, dry, and undamaged. Grading is typically done manually, separating large, medium, and small onions. Automated grading machines are also available to reduce labor costs and improve consistency. Proper grading and packaging lead to better market prices.
टॅग्स :शेती क्षेत्रकांदाशेतीकृषी योजना