Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्त्यात ३ हजार मिळण्याची शक्यता; वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्त्यात ३ हजार मिळण्याची शक्यता; वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana : Possibility of getting 3 thousand in next installment for dear sisters; Read in detail | Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्त्यात ३ हजार मिळण्याची शक्यता; वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्त्यात ३ हजार मिळण्याची शक्यता; वाचा सविस्तर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायम सुरू राहणार आहे, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा न झाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी?
लाडकी बहीण योजनेचा मागील वर्षातील डिसेंबर व जानेवारी मधील हप्ता हा दोन्ही महिन्यांच्या अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अशाच प्रकारे महिना अखेर जमा होईल अशी अपेक्षा होती. पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही.

फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याला उशीर का?
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला. पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली.

निकषात न बसणाऱ्या बहिणी अपात्र
लाडकी बहीण योजनेच्या निकषांत न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू आहे. ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाहीये. लाडकी बहीण योजनेचे निकष लावण्यात येत आहेत आणि या निकषांनुसार आतापर्यंत लाखो अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार?
आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण ३००० रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम येत्या आठ दिवसांत पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा: Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर

Web Title: Ladki Bahin Yojana : Possibility of getting 3 thousand in next installment for dear sisters; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.