Lokmat Agro >शेतशिवार > ladki bahin fasavnuk Action: सावधान ! सरकार लाडकी बहीण योजनेची करणार फेरतपासणी ; काय होतील परिणाम वाचा सविस्तर 

ladki bahin fasavnuk Action: सावधान ! सरकार लाडकी बहीण योजनेची करणार फेरतपासणी ; काय होतील परिणाम वाचा सविस्तर 

ladki bahin fasavnuk Action: Beware ! Government will re-examine the ladki bahin scheme; What will be the results read in detail  | ladki bahin fasavnuk Action: सावधान ! सरकार लाडकी बहीण योजनेची करणार फेरतपासणी ; काय होतील परिणाम वाचा सविस्तर 

ladki bahin fasavnuk Action: सावधान ! सरकार लाडकी बहीण योजनेची करणार फेरतपासणी ; काय होतील परिणाम वाचा सविस्तर 

लाडकी बहीण योजनेत अर्जदारांनी केलेले दावे योग्य आहेत की नाही, हे तपासण्यासाठी व्यापक पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. वाचा सविस्तर (ladki bahin fasavnuk Action)

लाडकी बहीण योजनेत अर्जदारांनी केलेले दावे योग्य आहेत की नाही, हे तपासण्यासाठी व्यापक पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. वाचा सविस्तर (ladki bahin fasavnuk Action)

शेअर :

Join us
Join usNext

ladki bahin fasavnuk Action : लाडकी बहीण योजनेत अर्जदारांनी केलेले दावे योग्य आहेत की नाही, हे तपासण्यासाठी व्यापक पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आर्थिक सहाय्य वितरणात अधिक पारदर्शकता येईल, असा सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे अपात्र अर्जदारांना वगळून फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, याची खात्री केली जाईल.

योजनेची अर्ज नोंदणी सुरू असली, तरी कागदपत्रांची सखोल तपासणी करून अर्ज मंजूर करण्यात यावेत, असे आदेश जिल्हास्तरावर देण्यात आला आहे. गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. त्याचबरोबर मिळालेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येईल, असे संकेतही देण्यात आले आहेत.

 राज्यातील सुमारे २ कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, सरकारची योजना फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर तपासणी प्रक्रिया सुरू करणार असून योजनेच्या लाभांची योग्यतेनुसार वाटप सुनिश्चित केले जाणार आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. 

बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांची सरकार पडताळणी करणार आहे. बनावट कागदपत्र सादर करुन कोणी लाभ घेतला असेल तर सरकार अशा लोकांकडून वसुलीही करू शकते आणि अशा लोकांना तुरुंगातही पाठवू शकते, असेही सांगण्यात आले आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेचा मासिक भत्ता १५०० रुपये वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता या योजनेच्या लाभार्थींशी संबंधित मोठा निर्णय घेण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. सरकार या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचतो आहे का, याची खात्री करण्यावर भर देणार आहे. 

आता सरकार या योजने संदर्भातील निकष अधिक कठोर करणार असल्याचे संकेत आहे, याचा उद्देश योग्य लाभार्थांपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा असा आहे. तसेच, प्राथमिक टप्यात अनेक अर्दारांना रक्कम प्राप्त झाली होती. 

त्यात जास्त कडक व्हेरिफिकेशन निकष नव्हते. त्या मुळे योजनेचे नियम डावलून अनेकांनी हि रक्कम आपल्या खात्यात वळती केली. परंतु आता हे चित्र बदलणार असून योग्य लाभार्थ्यांला रक्कम मिळेल.

Web Title: ladki bahin fasavnuk Action: Beware ! Government will re-examine the ladki bahin scheme; What will be the results read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.