नंदुरबार : राज्यातील काही भागात पावसाने जोरदार (Rain Alert) हजेरी लावली असून काही भागात अद्यापही पावसाची विश्रांती आहे. अशा परिस्थितीत म्हणजेच पावसाचा खंड पडल्यास पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar District) गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत, पिके कोमेजू लागली आहेत. शेतकऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. कापूस, मिरची, पपई, केळी आणि इतर पिकांना पाण्याची पाणी देणे आवश्यक आहे
काय आहे कृषी विभागाचा सल्ला...
- २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पीकं कोमजली आहेत.
- फळबाग आणि भाजीपाला पिकांना पाणी उपलब्ध असल्यास पाणी द्यावे.
- पाण्याचा ताण कमी करण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. पाण्याची कमतरता असल्यास सरी आड सरी पाणी द्यावे.
- पिकांची वरचेवर कोळपणी करावी. ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा रेन पाइप असल्यास पिकांना संरक्षित पाणी द्यावे.
- जैविक आच्छादनाचा वापर वाढवावा.
- पिकांच्या गंभीर अवस्थेत पाणी द्यावे.
- पाण्याची उपलब्धता कमी असल्यास नियमित पाणी न देता बाष्पोत्सर्जन कमी करणारी संयुगे यांचा पिकांवर फवारा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Mahadbt Lottery List : ऊस तोडणी यंत्राची लॉटरी यादी आली, अशी पहा संपूर्ण जिल्ह्यांनुसार लिस्ट