Join us
Daily Top 2Weekly Top 5

Krishi Vibhag Bharti : कृषी विभांगांतर्गत पदभरतीसाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:46 IST

कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी व उच्च श्रेणी) संवर्गातील सरळसेवा भरतीच्या ऑनलाईन परीक्षेच्या निकाल लागला.

पुणे : कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी व उच्च श्रेणी) संवर्गातील सरळसेवा भरतीच्या ऑनलाईन परीक्षेच्या निकाल लागला.

निकाला आधारे पात्र उमेदवारांची व्यावसायिक चाचणी दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाचे सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

कृषी विभागाच्या ८ विभागांमध्ये ही चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांनी आवेदन पत्रामध्ये सादर केलेल्या त्यांच्या वैयक्तिक ई-मेल वर पाठविण्यात आले आहेत.

परीक्षार्थीना प्रवेशपत्राबाबत (हॉल तिकीट) ई-मेल प्राप्त झाला नसल्यास संबंधित विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात २८ ते २९ जानेवारी २०२५ रोजी संपर्क साधावा.

प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

टॅग्स :राज्य सरकारपरीक्षामहाराष्ट्रसरकारपुणे