चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामाची १ हजार ७८८ गावांची अंतिम पैसेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ०.५४ पैसे आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ गावे असून केवळ १ हजार ८३३ गावांत खरीप पिके घेतली जातात.
त्यापैकी १ हजार ७८८ गावांची अंतिम पैसेवारी जाहीर झाली. यामध्ये ९४२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी, तर ५० पैशापेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ८४६ आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दर्शवते दुष्काळसदृश परिस्थिती
पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आल्यास दुष्काळसदृश परिस्थिती दर्शवते. कर्जमाफी व पीक विमा योजनांसाठी ही पैसेवारी महत्त्वाची ठरते. खरीप पिकांची अंतिम पैसेवारी म्हणजे त्या हंगामातील भरपाईसाठी शासनाने जाहीर केलेली आकडेवारी होय. पिकांच्या उत्पादनाचे नुकसान
तालुकानिहाय पैसेवारी
चंद्रपूर (१०१ पैकी ८६ गावे ) - ०.५३बल्लारपूर (३५ पैकी ३२ गावे) - ०.४५राजुरा (१११ पैकी ११० गावे) -०. ४८कोरपना (११३ पैकी ११३ गावे )- ०. ४७जिवती (८३ पैकी ७५ गावे) - ०. ५८गोंडपिपरी (९८ पैकी ९८ गावे) -०.४७पोंभूर्णा (७१ पैकी ७१ गावे) - ०. ५४मूल (११३ पैकी १११ गावे) - ०.५८सावली (१११ पैकी १११ गावे) - ०. ६९सिंदेवाही (११५ पैकी ११३) - ०. ५६नागभीड (१३८ पैकी १३८ गावे) - ०.६५ब्रह्मपुरी (१४० पैकी १३८) - ०. ६२चिमूर (२५९ पैकी २५८ गावे) -०.४७वरोरा (१८६ पैकी १८५ गावे) -०. ४७भद्रावती (१६२ पैकी १४९) - ०. ४८
Web Summary : Chandrapur district faces drought-like conditions. 942 villages have less than 50% crop yield. The overall district average is 0.54 paise. This impacts farmer loan waivers and crop insurance eligibility, revealed the administration.
Web Summary : चंद्रपुर जिले में सूखे जैसे हालात हैं। 942 गाँवों में 50% से कम फसल उपज है। जिले का औसत 0.54 पैसे है। प्रशासन ने बताया कि इससे किसानों की ऋण माफी और फसल बीमा पात्रता प्रभावित होगी।