मराठवाड्यातील प्रयोगशील तरुण शेतकरी आणि कृषी उद्योजकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र (KVK) सगरोळी नांदेड यांच्या वतीने 'कर्मयोगी बाबासाहेब देशमुख कृषिवेद युवा शेतकरी व युवा कृषी उद्योजक पुरस्कार- २०२६' ची घोषणा करण्यात आली आहे.
या पुरस्कारासाठी मराठवाडा विभागातून नामांकने मागविण्यात येत असून, प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर २०२५ आहे. तरी अनुकूल घटकांनी सदरील पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आजची युवा पिढी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करत आहे. अशा कर्तृत्ववान शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. सगरोळी केव्हीके द्वारे आयोजित 'कृषिवेद २०२६' या भव्य कृषी प्रदर्शनाच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
पुरस्काराचे स्वरूप आणि श्रेणी
• यावर्षी दोन प्रमुख श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. १. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख कृषिवेद युवा शेतकरी पुरस्कार २०२६ (पुरुष/महिला)., २. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख कृषिवेद युवा कृषी उद्योजक पुरस्कार (पुरुष/महिला).
• दोन्ही श्रेणींसाठी वयोमर्यादा २५ ते ४० वर्षे असून, विजेत्यांना प्रत्येकी ११,००० रुपये रोख व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.
कोणास प्रस्ताव पाठवता येईल?
मराठवाडा विभागातील शेतकरी, कृषी व्यावसायिक, स्टार्टअप्स, शेतकरी उत्पादक कंपनी (FPO), फळ प्रक्रिया उद्योग आणि कृषी क्षेत्रात कार्य करणारी कोणतीही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते.
अर्ज कसा करावा?
इच्छुकांनी आपला प्रस्ताव, संपूर्ण माहिती, कामाची छायाचित्रे आणि प्रसिद्धी कात्रणांसह पोस्ट, ईमेल किंवा व्हॉट्सॲपद्वारे पाठवावा. दरम्यान अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत असेही आयोजकांनी जाहीर केले आहे.
• ईमेल : kvksagroli@gmail.com, aex@kvksagroli.co.in • दूरध्वनी : 8830750398• पत्ता : कृषी विज्ञान केंद्र, शारदा नगर, सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड - ४३१७३१.
Web Summary : Krishi Vigyan Kendra, Sagroli, announces the Karmaveer Babasaheb Deshmukh Krushived Yuva Award 2026 to honor young, innovative farmers and agri-entrepreneurs in Marathwada. Nominations are open until December 30, 2025. Winners in two categories will receive ₹11,000 and a certificate at Krushived 2026.
Web Summary : कृषि विज्ञान केंद्र, सगरोली ने मराठवाड़ा के युवा, नवोन्मेषी किसानों और कृषि-उद्यमियों को सम्मानित करने के लिए कर्मवीर बाबासाहेब देशमुख कृषि वेद युवा पुरस्कार 2026 की घोषणा की। नामांकन 30 दिसंबर, 2025 तक खुले हैं। दो श्रेणियों में विजेताओं को कृषि वेद 2026 में ₹11,000 और एक प्रमाण पत्र मिलेगा।