Join us

Kapus Kharedi : शेतकऱ्यांनो! कापूस विक्री करताय; सुट्ट्यांमुळे विक्रीचे करा नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:24 IST

Kapus Kharedi : खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयमध्ये (CCI) चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल सीसीआयकडे वाढत आहेत. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे.

Kapus Kharedi : सीसीआयकडून (CCI) यावर्षी हमीभावाने कापूस खरेदी (Kapus Kharedi) ही बीड जिल्ह्यात व तालुक्यात करण्यात आलेली आहे. काही दिवस सर्व्हर डाऊन असल्याने मध्यंतरी खरेदी थांबली होती. 

त्यातच आता सीसीआयकडून कापूस खरेदीची (Kapus Kharedi) शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कापूस हंगाम सन २०२४-२०२५ मध्ये सीसीआयकडून चालू असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) बीडच्या कार्यक्षेत्रातील खरेदी ही १२ मार्च २०२५ पासून बंद होणार आहे.

खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयमध्ये (CCI) चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल सीसीआयकडे वाढत आहेत. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे.

खरेदीची शासकीय तारीख ही १५ मार्च २०२५ असली तरी १३, १४, १५ तीन दिवस हे सुटीचे आहेत. त्यामुळे या बाबींची नोंद घेत १२ मार्चपूर्वी कापूस विक्री करावी. ज्या शेतकऱ्यांचा कापूस विक्री करावयाचा राहिलेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनी एमआयडीसीमधील सिद्धी ॲग्रो, बहीरवाडी येथे कापूस विक्रीसाठी आणावा.

हे ही वाचा सविस्तर : kapus kharedi : 'सीसीआय'ची खरेदी बंद होताच कापसाचे दर क्विंटलमागे कसे? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डशेतकरीशेती