कांदा अनुदान योजना सन २०२२-२०२३ मध्ये फेरछाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरीत करण्याबाबत नवीन जीआर आला आहे.
दिनांक १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु ७/१२ उताऱ्यावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावांची फेरछाननी करुन पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना रुपये २८,३२,३०,५०७.५० इतकी कांदा अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर शासन निर्णयात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. कांदा अनुदान योजना सन २०२२-२३ योजनेअंतर्गत शासन निर्णय १२.०८.२०२५ मधील फेर छाननी अंती पात्र लाभार्थ्यांना कांदा अनुदान वितरित केलेल्या तपशिलातील अनुक्रमांक ५ पुढीलप्रमाणे आहे.
उपरोक्त अनुक्रमांक ५ मधील सातारा जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा अनुदानासाठी पात्र रक्कमेत खालीलप्रमाणे दुरूस्ती करण्यात येत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती - सातारा जिल्हाफेरछाननी अंतर्गत पात्र लाभार्थी संख्याकांदा अनुदानासाठी पात्र रक्कम रु. - ३,०३,८६,३०८.००
उपरोक्त मधील फेरछाननी अंती पात्र लाभार्थी संख्या व कांदा अनुदानासाठी पात्र रक्कमेत खालीलप्रमाणे दुरूस्ती करण्यात येत आहे.राज्य एकूण१) कृषी उत्पन्न बाजार समिती - १४,३०७कांदा अनुदानासाठी पात्र रक्कम रु. - २७,७९,७७,९२८.००२) खाजगी बाजार - ३५४कांदा अनुदानासाठी पात्र रक्कम रु. - ५२,५२,५७९.५०एकूण बाजार समित्या - १४,६६१कांदा अनुदानासाठी पात्र रक्कम रु. - २८,३२,३०,५०७.५०
अधिक वाचा: विस्माने 'हा' कारखाना ठरवला राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना; आज पुरस्कार वितरण