Join us

चाळीशीनंतर सांधेदुखीचा त्रास वाढता, शेतकऱ्यांनी कसा ठेवावा आहार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 5:17 PM

चाळिशीनंतर संसर्गमुक्त राहण्यासाठी अर्धा तास उन्हात बसा

वाढत्या वयानुसार कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. चाळिशीच्या पुढे शरीर संसर्गमुक्त ठेवत कॅल्शियम वाढणे आवश्यक आहे. कॅल्शियमची कमतरता असेल तर थकवा येणे, दातांच्या तक्रारी, सांधेदुखी, त्वचा कोरडी होणे अशा तक्रारी उद्भवतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते प्रौढांना दररोज एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियम आवश्यक असते. शरीरात योग्य प्रमाणात कैल्शियम नसेल तर लहान मुले, तरुणांमध्ये देखील आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते चाळिशीनंतर नियमित ३० मिनिटे सूर्यप्रकाशात बसावे, यामुळे व्हिटामीन 'डी' या जीवनसत्वाची पूर्तता होते. तसेच व्हिटामीन 'डी'मुळे शरीरातील कॅल्शियम शोषण कमी होते. तसेच इतर आजारांपासून संरक्षण मिळत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. कॅल्शियमसाठी हा आहार हवाअंजीर:अंजीरमध्ये कॅल्शियमसह फायबर्स आणि आयर्न देखील आहे, याची कॅल्शियम वाढण्यासाठी मदत होते.

संत्री, अननस : या फळांतही मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. तसेच जांभूळ, ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी कॅल्शियमयुक्त फळे आहेत.

चाळिशीतील प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात योग्य फळ व पदार्थांचा समावेश असणे अनिवार्य आहे. तसेच कॅल्शियमची पूर्तता करण्यासाठी व शरीर संसर्गमुक्त ठेवण्यासाठी किमान ३० मिनिटे सूर्यप्रकाशात बसावे. 'व्हिटॅमिन डी' शिवाय मानवी: शरीर कॅल्शियम शोषण होऊ शकत नाही. कॅल्शियमचे शरीरात योग्य प्रमाण असल्यास बहुतांश आजाराची लागण होत नाही. - डॉ. सतीश भाले, होमिओपॅथिक आणि आहारतज्ज्ञ

शेवग्याची पाने : शेवगा आरोग्यासाठी चांगला आहे असून शेवग्याची पाने देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असते.

तीळ : थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देण्यासाठी तीळ खाल्ली जाते इतरही ऋतूंमध्ये ठराविक प्रमाणात तीळ खाणे चालू शकते. काळ किंवा पांढरे तीळ भाजून खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.

बदाम : बदामात ३८५ मिलीग्रॅम कॅल्शियम, तर ८३८ कॅलरीज आणि ७२ टक्के चरबी असते. बदाम दूध घेतल्याने शरीरात मोठ्या प्रमाणात कैल्शियम मिळते, रुग्णाला हाडांची समस्या आढळल्यास आरोग्यतज्ज्ञ बदाम- दूध पिण्याचा सल्ला देतात.

टॅग्स :फळेआरोग्यशेतकरी