Join us

आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम; शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 09:26 IST

Jivant Satbara मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते.

मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी जिवंत सातबारा ही मोहीम राबविली जाणार आहे.

काय आहे जिवंत सातबारा मोहीम?महाराष्ट्र राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या सातबारातील नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधी अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे.

कोणाला होणार लाभ?मृत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते, अशा खातेदारांना लाभ होणार आहे.

ही कागदपत्रे लागणारवारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे (मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्यप्रतिज्ञालेख/स्वयंघोषणापत्र, पोलिस पाटील/सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक/भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासीबाबतचा पुरावा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करावे लागणार. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी स्थनिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ई-फेरफार प्रणालीमध्ये मंजूर केले जाणार आहे.

कधीपासून राबविणार?महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'जिवंत सातबारा मोहीम' १ एप्रिल २०२५ ते १० मे २०२५ पर्यंत राबविली जाणार आहे.

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना सूचनाग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी ई-फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा. त्यानंतर म.ज.म.अ. १९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदविलेल्या असतील.

संपर्क कुठे कराल?गावातील शेतकरी, जमीनमालक यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याशी संपर्क करून तत्काळ आपल्या वारसांबाबतची नोंद अधिकार अभिलेखात करून घ्यावी. काही अडचण आल्यास मंडळ अधिकारी तसेच तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिक वाचा: Namo Kisan Hapta : नमो किसानचा हप्ता जमा झाला कि नाही? हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल?

टॅग्स :शेतकरीशेतीराज्य सरकारमहसूल विभागसरकारग्राम पंचायततहसीलदार