Join us

Jalmitra : प्रत्येक ग्रामपंचायतीत तीन जलमित्र होणार नियुक्त; 'येथे' करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 10:24 IST

जल जीवन मिशनअंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने बहुकौशल्यावर आधारित प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडीकम प्लंबर, मेकॅनिकल फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जलमित्र यांची नेमणूक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

जल जीवन मिशनअंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने बहुकौशल्यावर आधारित नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडीकम प्लंबर, मेकॅनिकल फिटर व इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल जलमित्र यांची नेमणूक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळ जोडणीद्वारे प्रति माणसी प्रति दिन ५५ लिटर विहित गुणवत्तेसह व दैनंदिन स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. जिल्ह्यात शिखर समितीच्या मान्यतेनुसार प्रति ग्रामपंचायत याप्रमाणे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शाश्वत पाणीपुरवठा योजनेसाठी नियोजन

योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी व योजना शाश्वत टिकविण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. यासाठी या तंत्रज्ञांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

ग्रामसेवकांना निर्देश

मल्टी स्किलिंग मॉडेलच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संच पुढीलप्रमाणे: आहेत. तीन ट्रेडसाठी ग्रामपंचायतीमधील पूर्वानुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे, तसेच ग्रामसेवकांनी प्रत्येक ट्रेडसाठी ३ उमेदवार सहभागी करून एकूण ९ नल जलमित्र गुणवत्ता यादीनुसार अनुक्रमे विहित नमुन्यातील पत्राद्वारे तयार करून पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

माहिती पंचायत समितीकडे पाठवावी

प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने त्यांचे आयडेंटी साइज फोटो व आधार कार्ड पंचायत समिती येथे सादर करावयाची आहेत. त्यांची प्री-स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामधून प्रत्येक ग्रामपंचायतीत कौशल्य संचाकरिता एका ट्रेडसाठी एक उमेदवार याप्रमाणे अंतिम ९ पैकी ३ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

जलजीवन अंतर्गत प्रतिदिन ५५ लिटर

पाणीपुरवठा योजनेच्या पूर्व नियोजन टप्प्यापासून ते देखभाल दुरुस्ती टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय योजना टिकू शकत नाही. गावपातळीवरील उपलब्ध असलेल्या अप्रशिक्षित अर्धकुशल मनुष्यबळास कुशल प्रशिक्षण देण्यात येणार आहे

हेही वाचा - Poultry Success Story : अंडी विक्री व्यवसायाला पोल्ट्रीची साथ; भिकाभाऊंची आयुष्याच्या अडचणींवर दमदार मात

टॅग्स :ग्राम पंचायतशेती क्षेत्रशेतकरीग्रामीण विकाससरकारी योजना