Join us

विजेपासून बचावासाठी झाडाचा आश्रय घेणे चूक कि बरोबर; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:10 IST

अवकाळी पाऊस म्हटला की, आकाशात विजांचा कडकडाट होतो. त्यातच दरवर्षी वीज कोसळण्याचे प्रकार घडतात आणि अनेक जण कुठे ना कुठे मृत्युमुखी पडतात.

अवकाळी पाऊस म्हटला की, आकाशात विजांचा कडकडाट होतो. त्यातच दरवर्षी वीज कोसळण्याचे प्रकार घडतात आणि अनेक जण कुठे ना कुठे मृत्युमुखी पडतात.

या काळात सतर्क राहण्याचे आवाहन नेहमी संबंधित जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात येते, मात्र तरीही कळत-नकळत होणाऱ्या चुकांमुळे आसमानी संकटात अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे वीज अंगावर पडू नये म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे.

पाऊस सुरू होण्याच्या अगोदर आकाशात ढग दाटून येतात आणि गडगडाटासह वादळी वारा सुरू होतो. यादरम्यानच आकाशात विजा चमकतात आणि मोठ्या आवाजासह कुठेतरी जमिनीवर पडतात.

सध्या शेतीत पूर्वमशागतीची कामे सुरू झाली असून शेतात काम करणारे शेतकरी, मजूर आणि पशुधन यांना या विजांपासून धोका निर्माण होऊ शकतो.

बऱ्याचदा विजेपासून बचावासाठी झाडाचा आश्रय घेतला जातो, मात्र उंच झाड हे कोसळणाऱ्या विजेला आकर्षित करतात. त्यामुळे झाडाखाली आश्रय कोणत्याही परिस्थितीत घेऊ नये.

इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर टाळा१) विजा चमकत असताना मोबाइल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टीव्ही, दूरध्वनीचा वापर करू नये. या उपकरणांमुळे वीज आकर्षित होऊ शकते.२) तसेच विजा चमकत असताना विद्युत प्लगमध्ये हेयरडायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझर आदी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जोडणी देण्यात येऊ नये.३) असे केल्यास आपल्या घरावर वीज कोसळली तर त्यातील प्रभार प्लगच्या माध्यमातून विद्युत प्लगमध्ये येऊ शकते.४) घराचे नुकसान होऊ शकते आणि पर्यायी आपल्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो.

तत्काळ मोकळी जागा गाठा१) अवकाळी पाऊस आणि गडगडाटाच्या कालावधीत कोसळणारी वीज ही उंच वस्तूवर, ठिकाणावर कोसळते आणि धातूच्या वस्तूवर जास्त आकर्षित होते. त्यामुळे अशा वातावरणात उंच ठिकाणी जाण्याचे टाळावे.२) तत्काळ मोकळ्या जागेवर यावे आणि दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन त्यांना दोन्ही हातांनी आवळून ठेवावे. हनुवटी गुडघ्यांवर टेकवावी.३) धातूंच्या वस्तू, चाकू, गोल्फ खेळावयाची छडी, भांडे विशेषतः हे जर का शरीराच्या वरच्या बाजूला असल्यास विजा चमकत असताना दूर ठेवाव्यात.

अधिक वाचा: राज्यात १० दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांत अधिक प्रभाव?

टॅग्स :शेतीशेतकरीपाऊसहवामान अंदाजमोसमी पाऊसमोबाइलवीज