Join us

पावसात बचावासाठी इरलंच पडतंय सगळ्यात भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 14:49 IST

ग्रामीण भागात पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वी शेतकरी वेगवेगळे जुगाड करत होते. घोंगड्याची खोळ, बांबूपासून तयार केलेले Irale इरले आदींचा वापर केला जात होता, पण काळाबरोबर ही जुगाड बंद झाली आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : ग्रामीण भागात पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वी शेतकरी वेगवेगळे जुगाड करत होते. घोंगड्याची खोळ, बांबूपासून तयार केलेले इरले आदींचा वापर केला जात होता, पण काळाबरोबर ही जुगाड बंद झाली आहे.

मुळात पंधरा-वीस वर्षांपूर्वीचा पाऊस व आताच्या पावसात खूप बदल झाला. पाऊसमान कमी झाल्याने प्लास्टिक कागद, रेनकोटचा वापर शेती कामासाठी सर्रास होत आहे. साधारणतः पंधरा-वीस वर्षांपूर्वी जिल्ह्यात चार महिने पाऊस कोसळायचा. जून ते सप्टेंबरपर्यंत एकसारखा पाऊस राहत असल्याने पावसापासून बचावासाठी शेतकरी अनेक जुगाड करत होते.

१) उबदार 'डरले- बांबूपासून तयार केलेले डरले त्यावर प्लास्टिक कागद बांधला की कितीही पाऊस कोसळला तरी आत पाणी येत नाही.पूर्वी सर्रास याचा वापर केला जात होता. पण, काळाच्या ओघात पाऊस कमी झाला आणि 'इरले' अडगळीत पडले.करवीर तालुक्यातील उपवडे-आरडेवाडी येथे आजही शेतकरी इरल्याचा वापर करतात.

२) प्लास्टिक कागद- अलीकडे पाऊस कमी झाला व साधनेही बदलत गेली.आता सर्रास प्लास्टिक कागदाचा वापर केला जातो.या कागदाच्या आत सुतळी पोते व त्यावर प्लास्टिक कागद घातला तर संरक्षण होते.शिवारात काम करण्याबरोबरच वैरण कापणीसाठी हे सोयीस्कर पडत असल्याने बहुतांशी शेतकरी याचा वापर करतात.

पावसाळ्यातील गारठा झाला गायबपूर्वी पावसाळ्यात कमालीचा गारठा असायचा. त्यामुळे माणसांबरोबरच जनावरेही अक्षरशः गारठून जायची, दिवसभर अंगातून थंडी जात नव्हती. पण अलीकडे पावसाळा आहे की उन्हाळा हेच कळत नाही. पावसाळ्यातही अनेक ठिकाणी पंखे सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

प्लास्टिकचा वापरपावसाळा सुरु झाला आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री किंवा रेनकोटशिवाय अनेक जुगाड केले जातात. खेडेगावांत पोते वापरले जाते. कोणी प्लास्टिक पिशवीचा वापर करतो.

रेनकोट २ हजार, तर छत्र्या दोनशेला अलीकडे दुचाकीची संख्या वाढल्याने रेनकोटचा वापरही वाढला आहे. त्यामुळे चांगल्या कंपनीचा रेनकोट २ हजार रुपयांपर्यंत आहे. छत्र्यांच्या वापरात फारशी वाढ झाली नसली तरी १०० ते २०० रुपयांपर्यंत छत्र्यांचे दर आहेत.

टॅग्स :शेतकरीशेतीपेरणीपाऊसमहिला