नवी दिल्ली : बँकांसह शासन आणि पोस्टाच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या फायदेशीर योजना आहेत. यामध्ये अटल पेन्शन योजनेचा समावेश होतो. या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही या योजनेत दर महिन्याला २१० रुपये गुंतवले तर निवृत्तीनंतर म्हणजेच ६० व्या वर्षांनंतर दरमहा ५ हजार रुपयांची पेन्शन मिळेल.
पहा गुंतवणुकीच संपूर्ण गणित सध्याच्या नियमांनुसार, १८ व्या वर्षी यात गुंतवणूक सुरू केल्यास तुम्हाला ५ हजार रुपये मासिक पेन्शनसाठी महिन्याला २१० रुपेय द्यावे लागतील. जर हीच रक्कम तुम्ही ३ महिन्यांनी दिली तर तुम्हाला ६२६ रुपये भरावे लागतील. तर सहा महिन्यांसाठी ही रक्कम १२३९ रुपये असेल. दरमहा १ हजार रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी गुंतवणूक केल्यास तुम्हाला महिन्याला ४२ रुपये द्यावे लागतील.
हेही उदाहरण समजून घेऊयात... वरील समीकरण आपण पाहिलं जे की १८ वर्षे पूर्ण असलेल्या महिलांसाठी २१० रुपये गुंतवून निवृत्तीनंतर ०५ हजार रुपयांची पेन्शन सुरू होईल. जर समजा २५ वय असेल आणि ०५ हजार रुपयांची पेन्शन मिळवायचे असेल तर तुम्हाला ३७६ रुपयांचा मासिक हप्ता द्यावा लागेल आणि जर तुमचं वय ४० असेल तर तुम्हाला १४५४ मासिक हप्ता द्यावा लागेल. यामध्ये कमी मासिक हप्ते देखील आहेत मात्र पेन्शनही कमी होत जाते.
अधिक माहितीसाठी पुढील तक्ता काळजीपूर्वक पहा...
| रक्कम | १८ वर्षे (मासिक हप्ता) | २५ वर्षे (मासिक हप्ता) | ४० वर्षे (मासिक हप्ता) |
|---|---|---|---|
| १ हजार रुपये | ४२ रुपये | ७६ रुपये | २९१ रुपये |
| २ हजार रुपये | ८४ रुपये | १५१ रुपये | ५८२ रुपये |
| ३ हजार रुपये | १२६ रुपये | २२६ रुपये | ८७३ रुपये |
| ४ हजार रुपये | १६८ रुपये | ३०१ रुपये | ११६४ रुपये |
| ५ हजार रुपये | २१० रुपये | ३७६ रुपये | १४५४ रुपये |
(सर्व रक्कम रुपयांत, ही ६० वर्षानंतरची मासिक पेन्शन आहे)
महिलांना ही योजना का आवडते आहे?कमी मासिक रकमेसह भविष्य सुरक्षित होते; नियमित उत्पन्न नसले तरीही योजना उपलब्ध आहे. ग्राहकाच्या मृत्यूनंतर जोडीदाराला पेन्शन, जोडीदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनीला पूर्ण रक्कम परत मिळते. गृहिणींसाठी सोपा पर्याय, तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते.
Web Summary : Invest in Atal Pension Yojana and secure ₹5,000 monthly pension after 60. Starting at age 18 requires ₹210 monthly; amounts vary with age. The scheme ensures financial security for women and provides benefits to the spouse and nominee after the subscriber's death.
Web Summary : अटल पेंशन योजना में निवेश करें और 60 वर्ष के बाद ₹5,000 मासिक पेंशन सुरक्षित करें। 18 वर्ष की आयु में शुरुआत करने पर ₹210 मासिक की आवश्यकता होती है; आयु के साथ राशि बदलती है। यह योजना महिलाओं के लिए वित्तीय सुरक्षा सुनिश्चित करती है और ग्राहक की मृत्यु के बाद पति या पत्नी और नामांकित व्यक्ति को लाभ प्रदान करती है।