Join us

राज्यातील सर्व खत विक्रेत्यांसाठी कृषी विभागाचा महत्वाचा आदेश; आता 'या' खत विक्रेत्यांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:49 IST

खत विक्रीच्या नोंदी या तात्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. यासाठी खालील बाबतीत कार्यवाही करण्यात यावी.

सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना सूचित करण्यात येते की, अनुदानित रासायनिक खतांची विक्री ही ई-पॉस (e-PoS) प्रणालीच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे.

खत विक्रीच्या नोंदी या तात्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. यासाठी खालील बाबतीत कार्यवाही करण्यात यावी.

ई-पॉस (e-PoS) स्टॉक व प्रत्यक्ष साठा समान असणे◼️ विक्रेत्यांच्या e-PoS प्रणालीवरील खत साठा व प्रत्यक्ष गोडाऊनमधील साठा यामध्ये कोणतीही तफावत असू नये.◼️ यासाठी रासायनिक खतांच्या विक्रीची नोंद iFMS प्रणालीमध्ये तत्क्षणी (Real Time) घेणे बंधनकारक आहे.◼️ याबाबात नियमित तपासणी करणेसाठी क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत.◼️ ज्या विक्रेत्यांकडे e-PoS वरील खत साठा व प्रत्यक्ष साठा यामध्ये फरक आढळेल, अशा विक्रेत्यांचे परवान्यांवर नियामोचीत कारवाई करण्याच्या सूचना परवाना अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. 

नवीन L1 security e-PoS मशीन बाबतज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन L1 security e-PoS मशीन प्राप्त केलेले नाहीत त्यांनी संबंधित जिल्ह्यातील कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून दि. १० ऑगस्ट २०२५ पूर्वी e-PoS मशीन प्राप्त करून कार्यान्वित करून घ्यावे.

अधिक वाचा: सर्व कृषी अधिकाऱ्यांचे गुणवत्ता नियंत्रण अधिकार काढले; आता सगळी जबाबदारी 'या' अधिकाऱ्याकडे

टॅग्स :खतेसरकारराज्य सरकारमहाराष्ट्रऑनलाइन