Join us
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीसाठी हरभरा, ज्वारीचे पीक घ्याल तर मिळेल अनुदान, कुठे कराल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 14:07 IST

काय कागदपत्रे लागणार?

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत रब्बी हंगामासाठी कडधान्य योजनेअंतर्गत १० वर्षांच्या आतील व १० वर्षांवरील हरभरा बियाणे महाबीजकडून अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गतच्या कडधान्य योजनेत अनुदानावर १० वर्षांच्या आतील हरभऱ्याचे बियाणे ३ हजार २९४ क्विंटल तर १० वर्षांवरील ११०८ क्विंटल बियाणे महाबीजकडून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. १० वर्षांच्या आतील फुले विक्रम, फुले विक्रांत, एकीजी- ११०९, बीजीएम,१०२१६ वाणाचे हरभऱ्याच्या बियाणांची २० किलोची बॅग असून त्याची मूळ किंमत १ हजार ७०० रुपये प्रति बॅग रुपये प्रति बॅग आहे. त्यावर ५०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान वजा करून ही बॅग १२०० रुपयांना मिळणार आहे. 

तसेच १० वर्षांवरील विजय दिग्विजय वाणाची बॅग ही २० किलोची आहे. तिची मूळ किंमत १ हजार ५४० रुपये आहे. त्यावर ३०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान वजा करुन १ हजार २४० रुपये दराने हरभरा बियाणे महाबीजचे विक्रेते व उपविक्रेत्यांकडे उपलब्ध करण्यात येणार आहेत. 

जास्तीत जास्त ५ बॅग मिळणार...

अनुदानित १० वर्षांच्या आतील हरभरा बियाणे खरेदीसाठी ज्या शेतकयांनी कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज केला आहे, त्यांनी कृषी सहायक अथवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून परमीट घेऊन बियाणे खरेदी करावे. इतर शेतकऱ्यांनी महाबीज विक्रेते व उपविक्रेत्याकडे ७/१२ व आधारकार्डची झेरॉक्स प्रत देऊन अनुदानित बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.  

७/१२, आधार कार्ड महत्वाचे..

अनुदानित हरभरा बियाणे हे एका शेतकन्याला ७/१२ वरील क्षेत्रानुसार जास्तीत जास्त ५ एकरसाठी ५ बॅगपर्यंत खरेदी करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायक अथवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून परमीट घेऊन व इतर शेतकऱ्यांनी ७/१२ व आधारकार्डची झेरॉक्स प्रत देऊन अनुदानित हरभरा बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकायांनी केले आहे.

परमिट मिळाल्यानंतर बियाणे

 महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने परमिट देण्यात येणार आहे. त्यानंतर कृषी निविष्ठा विक्रेता दुकानातून बियाणे उपलब्ध होणार आहे. दरम्यान, बियाणे शिल्लक राहिल्यास प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना बियाणे मिळणार आहे.

टॅग्स :शेतकरीरब्बीशेती क्षेत्र