lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > हरभऱ्यावरील रोपे, शेंडे व पाने कुरतडणाऱ्या (कट वर्म) किडीचे ओळख व व्यवस्थापन

हरभऱ्यावरील रोपे, शेंडे व पाने कुरतडणाऱ्या (कट वर्म) किडीचे ओळख व व्यवस्थापन

Identification and management of plant, stem and leaf cutting (cutworm) pests of gram chick pea | हरभऱ्यावरील रोपे, शेंडे व पाने कुरतडणाऱ्या (कट वर्म) किडीचे ओळख व व्यवस्थापन

हरभऱ्यावरील रोपे, शेंडे व पाने कुरतडणाऱ्या (कट वर्म) किडीचे ओळख व व्यवस्थापन

हरभरा पिकावर शेंडे, पाने व रोप कुडतडणारी अळी (कट वर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीची ओळख, नुकसानीचा प्रकार व व्यवस्थापन कसे करावे ते पाहूया.

हरभरा पिकावर शेंडे, पाने व रोप कुडतडणारी अळी (कट वर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीची ओळख, नुकसानीचा प्रकार व व्यवस्थापन कसे करावे ते पाहूया.

शेअर :

Join us
Join usNext

हरभरा पिकावर शेंडे, पाने व रोप कुडतडणारी अळी (कट वर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीची ओळख, नुकसानीचा प्रकार व व्यवस्थापन खालीलप्रमाणे आहे.

ओळख
हि एक बहुभक्षीय किड असुन या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने उशिरा पेरणी केलेल्या पिकावर होतो. मादी पतंग सुरूवातीला पिकाच्या व तणाच्या पानांवर तसेच कोवळया शेंड्यांवर एक एक करून किंवा समुहाने ३०० ते ४५० अंडी घालते. अळीची लांबी ही ०.२ ते १.५ इंच असते या अळीचा रंग हा भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा असतो. या अळीच्या शरीरावर करड्या रंगाचा पट्टा शरीराच्या दोन्ही बाजुने असतो.

नुकसानीचा प्रकार
शेतामधे पाने, शेंडे कुरतडलेल्या अवस्थेत दिसुन येतात, मात्र अळी ही झाडाच्या बुंद्याला माती मधे लपून बसते व मुख्यत्वे रात्री पिकावर येवुन पाने व शेंडे कुरतडते. प्रादुर्भाव जास्त असल्यास दिवसा देखील हि अळी पिकावर आढळून येते. पुर्ण वाढ झालेली अळी १.५ ते २ इंच लांब असते. अळीला स्पर्श केल्यास ती शरीराचा "C" आकार करतांना दिसुन येते. पिकाच्या सर्व अवस्थामधे या अळीचा प्रादुर्भाव होवू शकतो. हि किड रोप अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास रोप कुरतडते व नंतरच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पाने व शेंडे कुरतडते. पुर्ण वाढ झालेली अळी ही जमिनीमधे कोषावस्थेत जाते.

व्यवस्थापन
- शेतामधे किंवा बांधावर कचऱ्याचे ढीग तसेच तण राहणार नाही असे नियोजन करावे.
- प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळया खाऊन फस्त करतात.
या अळीचा प्रादुर्भाव लष्करी अळी प्रमाणे एकच वेळी आढळून येते म्हणुन शेतातील पिकामध्ये मादी पतंगाने अंडी घालू नये या करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अॅझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- प्रादुर्भाव दोन अळ्या प्रति मिटर ओळ अशी आर्थिक नुकसानीची पातळी आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस २० टक्के ईसी ५० मिली किंवा क्लोरॅट्रेनिप्रोल १८.५ टक्के ३.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- आवशक्ता भासल्यास १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
- व्यवस्थापन यामधील रासायनीक किटकशाकांच्या शिफारसी ह्या तदर्थ (Adhoc) स्वरुपाच्या आहेत.

डॉ. डी. बी. उंदिरवाडे
विभाग प्रमुख, किटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Web Title: Identification and management of plant, stem and leaf cutting (cutworm) pests of gram chick pea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.