Lokmat Agro >शेतशिवार > विहिरीतील पाणी मोट वापरून कसे काढले जायचे? जाणून घ्या सविस्तर

विहिरीतील पाणी मोट वापरून कसे काढले जायचे? जाणून घ्या सविस्तर

How was water from a well drawn using a bullock driven mot? Read in detail | विहिरीतील पाणी मोट वापरून कसे काढले जायचे? जाणून घ्या सविस्तर

विहिरीतील पाणी मोट वापरून कसे काढले जायचे? जाणून घ्या सविस्तर

जुन्या काळातील विहिरींवरील पाणी उपसा करण्यासाठी मोटांचा वापर केला जायचा. या मोटातून पाणी शेंदून ते पाटाच्या माध्यमातून शेताला पुरविले जायचे.

जुन्या काळातील विहिरींवरील पाणी उपसा करण्यासाठी मोटांचा वापर केला जायचा. या मोटातून पाणी शेंदून ते पाटाच्या माध्यमातून शेताला पुरविले जायचे.

शेअर :

Join us
Join usNext

सहदेव खोत
जुन्या काळातील विहिरींवरील पाणी उपसा करण्यासाठी मोटांचा वापर केला जायचा. या मोटातून पाणी शेंदून ते पाटाच्या माध्यमातून शेताला पुरविले जायचे.

ग्रामीण भागातील अशा जुन्या विहिरींवर मोटांचे अवशेष अजूनही टिकून असल्याचे पहावयास मिळत आहे. पूर्वी शेती सिंचन हे विहिरीवर अवलंबून होते.

प्रत्येक गावागावात दगडी फाडींमध्ये बांधकाम केलेल्या अनेक विहिरी आहेत. त्या विहिरींवर मोटांचा वापर केला जायचा. विहिरींच्या काठावर दगडी चौथरे तयार करून त्यात मोट चालवली जायची.

दोन लाकडी खांब उभे करून त्यावर कप्पी बसवून त्याच्या सहाय्याने विहिरीच्या पाण्यात दोराला बांधलेले एक मोठे भांडे सोडून बैलांकरवी ही मोट चालवली जायची.

मोटेच्या भांड्यातून शेंदलेले पाणी विहिरीच्या काठावरच्या हौदात ओतून ते पाटाने रानात सोडले जायचे. अशाप्रकारे अतिशय कष्टाने पासल्या पाटाने हे पाणी शेतीला दिले जायचे व शेती पिकवली जायची. याचे अवशेष आजही आपणास पहायला मिळतात.

कष्टमय जीवनाची प्रचिती
सध्या ग्रामीण भागात अनेक जुन्या विहिरींवर मोटेचे हे अवशेष अजूनही पाहावयास मिळत आहेत.
लाकडाचे खांब, कप्पी, हौद, दगडी पाट असे मोटेतील भाग नजरेस पडत आहेत.
मोट चालवण्याच्या निमित्ताने शेतकरी पैरा करायचे.
एकमेकांच्या बैलजोड्या आणून परस्पर सहकार्याने काम पूर्ण करायचे.
या मोटांचे अवशेष व रचना पाहिल्यानंतर गतकाळातील शेतकऱ्यांच्या कष्टमय जीवनाची प्रचितीच येते.

अधिक वाचा: मूळव्याध व पोटांच्या विकारांवर अत्यंत गुणकारी 'ही' रानभाजी तुम्हाला माहिती आहे का?

Web Title: How was water from a well drawn using a bullock driven mot? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.