Join us

बियाणे गुणवत्ता, खतांची साठेबाजी व लिंकींग यासाठी कृषी विभागाकडे कशी कराल तक्रार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 10:55 IST

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्या करिता केलेल्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यात शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्व अनन्यसाधारण आहे. राज्यातील शेतकरीखरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात.

अशावेळी बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे.

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, महोदयांनी खरिप हंगाम २०२५ च्या आढावा सभेमध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्तापूर्ण उपलब्धता व्हावी.

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्या करिता केलेल्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

सदर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी संपर्काचा WhatsApp क्रमांक 9822446655 उपलब्ध करुन देण्यात आला आहे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल.

या सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेल वर सुद्धा पाठवता/नोंदवता येईल.

संबंधीतांनी, उपरोक्त नमुद WhatsApp क्रमांक (9822446655), टोल फ्री भ्रमणध्वणी क्रमांक (18002334000) तसेच ई-मेलवर (controlroom.qc.maharashtra@gmail.com) येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा.

सदर माहिती को-या कागदावर लिहून त्याचा फोटो WhatsApp किंवा ई-मेलवर पाठवल्यास सुध्दा आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल.

ज्या शेतकऱ्यांना WhatsApp चा वापर करणे शक्य नसेल त्यांनी उपरोक्त क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात.

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी १ भ्रमणध्वणी, १ टोल फ्री क्रमांक व १ ई मेल तक्रार निवारणासाठी समर्पीत केलेले असुन त्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत नोंदवण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

अधिक वाचा: आता शेतरस्ते होणार रुंद, महसूल विभागाने घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीपीकखतेखरीपराज्य सरकारसरकारमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस