Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक गॅस सिलिंडर घेतल्यानंतर पुढील बुकिंग आता किती दिवसांनी होणार? काय झालाय बदल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:06 IST

gas cylinder booking गॅस एजन्सींच्या साठ्याची नियमित तपासणी केली जाईल. घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा व्यावसायिक वापर करताना आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायदांतर्गत कारवाई करण्यात केली जाणार आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरचे ऑनलाइन बुकिंग आता बंधनकारक असून, पहिला सिलिंडर घेतल्यापासून २६ दिवस झाल्याशिवाय दुसरा सिलिंडरचे बुकिंग करता येणार नाही.

या संदर्भात प्रणालीमध्ये तसे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी नव्या बदलाची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मध्यपूर्व आशियात इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या विक्री अधिकारी व गॅस व पेट्रोल वितरकांची दि. १० रोजी बैठक झाली.

यावेळी पेट्रोल, डिझेल, तसेच एनपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून, त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल, असे संबंधित गॅस वितरकांकडून स्पष्ट करण्यात आले.

त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर, गॅस वितरकांच्या कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

गॅस एजन्सींच्या साठ्याची नियमित तपासणी केली जाईल. घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा व्यावसायिक वापर करताना आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायदांतर्गत कारवाई करण्यात केली जाणार आहे.

अधिक वाचा: कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी मिळतंय २५ लाखांचे अनुदान; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Cylinder Booking: New 26-Day Rule and Stock Availability

Web Summary : A new rule mandates a 26-day gap between LPG cylinder bookings. District administration assures sufficient gas and petrol stock amidst Iran tensions, urging public to avoid panic and hoarding. Strict action against illegal gas storage will be taken.
टॅग्स :युद्धसरकारराज्य सरकारपेट्रोलपेट्रोल पंपजिल्हाधिकारीऑनलाइन