Join us
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाले तर वन विभागाकडून कशी दिली जाते भरपाई? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 08:52 IST

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी भरपाईसाठी अर्ज केल्यानंतर वनरक्षक, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी यांची समिती तपासणी करते.

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी भरपाईसाठी अर्ज केल्यानंतर वनरक्षक, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी यांची समिती तपासणी करते.

वनरक्षक पिकांचे नुकसान वन्यप्राण्यांमुळे झाले आहे का? याची शहानिशा करतो. प्राण्यांच्या पायाचे ठसे, प्राण्यांची विष्ठा, प्राण्यांचा वावर यावरून वन्यप्राणी नुकसानग्रस्त क्षेत्रात आले होते का? हे ठरवतात.

ग्राम महसूल अधिकारी नुकसानग्रस्त क्षेत्र अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचेच आहे का? हे तपासतात. ग्राम कृषी अधिकारी नुकसानग्रस्त क्षेत्र किती आणि नुकसानीची टक्केवारी किती? हे काढतात.

या समितीने आपला अहवाल वनपालांमार्फत वनक्षेत्रपाल यांना पाठविल्यानंतर भरपाईची रक्कम काढली जाते. पंचनाम्यात नुकसानग्रस्त क्षेत्रात कोणते पीक आहे. नुकसानीची टक्केवारी किती याची माहिती असते.

त्यावरून नुकसानग्रस्त क्षेत्रातील उत्पादनात किती गट येणार, हे काढले जाते. कृषी विभागाकडून त्यासंबंधी गावात त्या पिकाची मागील पाच वर्षे सरासरी उत्पादकता किती याची माहिती घेतली जाते.

त्यानंतर पिकाच्या उत्पादनात ज्या प्रमाणात घट येणार त्याला संबंधित पिकाच्या हमीभावाच्या आधारे नुकसान भरपाई दिली जाते. वनाच्या शेजारीच नाही तर वनापासून दूर असलेले शेतामध्ये वन्यप्राणी पिकांचे नुकसान करत असतात.

पंचनाम्याचा अहवाल सादर करणे आवश्यक◼️ अर्ज मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत पंचनाम्याचा अहवाल वनक्षेत्रपाल यांना सादर करणे आवश्यक आहे.◼️ वनक्षेत्रपाल समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विशिष्ट शिफारशी व तत्काळ सहायक वनसंरक्षकाकडे पाठवतील.◼️ त्यानंतर शेतकऱ्यांना एका महिन्यात भरपाई मिळते.

अधिक वाचा: सिमेन सॉर्टिंग तंत्राने घडवला यशाचा गोठा; गलांडवाडीच्या संदीप शितोळेंच्या दुग्धव्यवसायाचा प्रेरणादायी प्रवास

English
हिंदी सारांश
Web Title : Crop damage by wild animals? Forest department compensation process explained.

Web Summary : Farmers get compensation for crop damage by wild animals after verification. A committee assesses the damage extent, cause, and farmer's eligibility. Compensation is based on yield loss and government-fixed prices, disbursed within a month after report submission.
टॅग्स :पीकजंगलवनविभागसरकारशेतीशेतकरी