Join us

अतिवृष्टीचा फटका; ऐन दिवाळीच्या दिवशी अडीच एकर हळदीवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:24 IST

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पाणी आले होते. या पाण्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.

रामेश्वर बोरकर

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पाणी आले होते. या पाण्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. या चिंतेतच नांदेड जिल्ह्याच्या निवघा बाजार (ता. हदगाव) येथील शेतकऱ्याने चक्क अडीच एकर हळद पिकावर ट्रॅक्टर फिरविला.

शेतकरी प्रमोद कन्हाळे यांची अडीच एकर हळद पीक खरडून गेले होते. महागडी औषधे फवारणी, ड्रिचिंग करून काही उपयोग झाला नाही. उपाययोजना करूनही हळद पिकात सुधारणा झाली नाही. त्यामुळे हळदीच्या उभ्या पिकात ऐन दीपावली सणाच्या दिवशी शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवला आहे.

पारंपरिक पिकापेक्षा हळद पिकाचे उत्पादन अपेक्षित मिळेल म्हणून मोठ्या अपेक्षेने अडीच एकर क्षेत्रात हळदीची लागवड केली होती. हळदीला वेळेवर औषध व रासायनिक खते दिली. त्यामुळे हळद पीक जोमात आले होते. परंतु ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळच नदी, ओढ्यांना पूर आला.

या पुरामुळे हळद बहुतांश शेतकऱ्यांचे हळद पीक खरडून गेले. त्यात निवघा येथील शेतकऱ्यांचाही समावेश होता. पिकात सुधारणा होत नसल्याने शेवटी शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवला.

लागवड खर्च काढावा तरी कसा?

• यावर्षी हळदीला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी फवारणी व इतर उपाययोजना केल्या. हळदीचे पीक जोमात आले होते. आतापर्यंत हळदीचा लागवड खर्च दोन ते अडीच लाख रुपये खर्च झाला असल्याचे शेतकरी प्रमोद कन्हाळे यांनी सांगितले. हा झालेला खर्च कसा भरुन काढावा हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

• शासनाने नुकसानीचा मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकरी कहऱ्हाळे यांनी केली आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीही आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यास प्रशासनाने अनुदान द्यावे, असे म्हटले आहे.

हेही वाचा : शेतमाल विक्रीनंतर २४ तासांत पैसे न मिळाल्यास 'गुलाबी' पावती ठरेल फायद्याची; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer destroys turmeric crop with tractor due to heavy rain loss.

Web Summary : Heavy rains ruined a farmer's turmeric crop in Nanded. Facing huge losses despite investments, the farmer destroyed his 2.5-acre field with a tractor on Diwali. He seeks government compensation for the incurred expenses.
टॅग्स :पूरशेती क्षेत्रपीकशेतीशेतकरीनांदेडनांदेडमराठवाडाबाजार