Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Hantavirus : नेमका काय आहे हंटा व्हायरस? जाणून घ्या संसर्ग, लक्षणे आणि खबरदारीबाबत उपाय

Hantavirus : नेमका काय आहे हंटा व्हायरस? जाणून घ्या संसर्ग, लक्षणे आणि खबरदारीबाबत उपाय

Hantavirus : What exactly is Hantavirus? Know about infection, symptoms and precautions | Hantavirus : नेमका काय आहे हंटा व्हायरस? जाणून घ्या संसर्ग, लक्षणे आणि खबरदारीबाबत उपाय

Hantavirus : नेमका काय आहे हंटा व्हायरस? जाणून घ्या संसर्ग, लक्षणे आणि खबरदारीबाबत उपाय

एका आंतरराष्ट्रीय क्रुझ जहाजावर प्रवास करणाऱ्या दोन भारतीय प्रवाशांना खतरनाक 'हंटा व्हायरस'ची लागण झाल्याचे अलीकडेच निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सावध झाल्या असून, भारतातही या आजाराबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका आंतरराष्ट्रीय क्रुझ जहाजावर प्रवास करणाऱ्या दोन भारतीय प्रवाशांना खतरनाक 'हंटा व्हायरस'ची लागण झाल्याचे अलीकडेच निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सावध झाल्या असून, भारतातही या आजाराबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका आंतरराष्ट्रीय क्रुझ जहाजावर प्रवास करणाऱ्या दोन भारतीय प्रवाशांना खतरनाक 'हंटा व्हायरस'ची लागण झाल्याचे अलीकडेच निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सावध झाल्या असून, भारतातही या आजाराबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तथापि, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या मते, हंटा व्हायरस हा कोरोनासारखा वेगाने पसरणारा संसर्ग नसला तरी, त्याबद्दलची माहिती आणि खबरदारी घेणे काळाची गरज आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ या विषाणूचा प्रसार होणार नाही, यासाठी कोणती काळजी घ्यावी ते वाचूया..

हंटा व्हायरस नेमका काय प्रकार आहे?
◼️ हंटा व्हायरस हा प्राणी प्रसारित रोग आहे.
◼️ उंदीर, घुशी आणि तत्सम कुरतडणाऱ्या प्राण्यांमार्फत पसरणारा विषाणूंचा तो एक समूह आहे.
◼️हंटा व्हायरस प्रामुख्याने संक्रमित उंदरांच्या मूत्र, विष्ठा किंवा लाळेतील विषाणूंचे कण श्वासावाटे आत घेतल्याने मानवांमध्ये पसरतो.
◼️ हे कण हलवल्यावर, विशेषतः साफसफाई करताना किंवा बंद जागेत, हवेत मिसळतात आणि फुफ्फुसात प्रवेश करतात.
◼️ या विषाणूच्या विशिष्ट प्रकारच्या प्रजातींमध्ये क्यचितच मानवाकडून मानवाकडे संक्रमण होते.
◼️ तसा हा विषाणू नवीन नाही, परंतु मे २०२६ मध्ये क्रूझवरील एका क्लस्टरमध्ये या संसर्गाची प्रकरणे आढळल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
◼️ हे प्रामुख्याने मानवामध्ये गंभीर श्वसन विकार किंवा मूत्रपिंडाचे आजार निर्माण करू शकतात.

संसर्गाचा प्रसार कसा होतो?
हंटा व्हायरसचा प्रसार प्रामुख्याने उंदरांच्या माध्यमातून होतो. याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१) हवेद्वारे संक्रमण
उंदरांचे मूत्र, विष्ठा किंवा लाळ सुकून धुळीत मिसळतात. जेव्हा आपण अशा दूषित हवेत श्वास घेतो, तेव्हा हे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. (उदा., गोठे, शेड साफ करणे किंवा प्रादुर्भाव झालेल्या वस्तू हाताळणे).
२) थेट संपर्क
उंदरांनी कुरतडलेल्या वस्तूंना स्पर्श करणे आणि त्यानंतर तोच हात तोंड, नाक किंवा डोळ्यांना लावल्याने संसर्ग होऊ शकतो. मूत्र, विष्ठा किंवा तत्सम साहित्याला स्पर्श करणे आणि नंतर डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे.
३) उंदीर चावणे
एखादा बाधित उंदीर माणसाला चावला तरी हा विषाणू पसरू शकतो.

लक्षणे आणि टप्पे
◼️ सुरुवातीची लक्षणे
यात तीव्र ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, चक्कर येणे आणि स्नायू दुखणे (विशेषतः कंबर, मांड्या आणि खांदे) यांचा समावेश होतो.
◼️ गंभीर लक्षणे
जर संसर्ग फुप्फुसांपर्यंत पोहोचला, तर त्याला 'हंटा व्हायरस पल्मनरी सिंड्रोम' म्हणतात, ज्यामध्ये श्वास घेण्यास प्रचंड त्रास होतो आणि फुप्फुसात पाणी भरू शकते.

प्रतिबंधात्मक उपाय
१) उंदरांचा नायनाट करा

घरात किंवा परिसरात उंदरांची बिळे सिमेंटने वा जाळीने बंद करा.
२) अन्न सुरक्षित ठेवा
पिण्याचे पाणी आणि अन्न उंदीर पोहोचू शकणार नाहीत अशा ठिकाणी, हवाबंद डब्यात ठेवा.
३) सफाईची विशेष पद्धत
उंदीर असलेल्या ठिकाणी झाडू मारताना धूळ उडणार नाही याची काळजी घ्या. कोरडा झाडू न वापरता 'डिसइन्फेक्टंट' आणि ओल्या कापडाने जागा स्वच्छ करा. ब्लीच किंवा फिनाइल जंतुनाशके वापरा.

उपचार
◼️ या संसर्गावर कोणताही विशिष्ट इलाज, विषाणूरोधक औषध किंवा लस उपलब्ध नाही.
◼️ प्रामुख्याने सर्दी, ताप यावरील औषधे दिली जातात आणि गंभीर आजारात श्वास घेण्यास मदत करणारी सेवा पुरवली जाते.

डॉ. अविनाश सुपे
माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

अधिक वाचा: विरोध झालेल्या भागातूनच आता शक्तिपीठ महामार्गाची पुन्हा मागणी; भूसंपादन मोबदला वाढणार?

Web Title : हंतावायरस: लक्षण, संचरण, और सावधानियां जो आपको अभी जाननी चाहिए।

Web Summary : कृंतकों द्वारा फैलने वाला हंतावायरस, दूषित कणों के साँस लेने से खतरा पैदा करता है। लक्षणों में बुखार और मांसपेशियों में दर्द शामिल हैं, जो संभावित रूप से गंभीर श्वसन समस्याओं का कारण बनते हैं। रोकथाम में कृंतक नियंत्रण और सावधानीपूर्वक सफाई शामिल है। कोई विशिष्ट उपचार मौजूद नहीं है; देखभाल लक्षणों के प्रबंधन पर केंद्रित है।

Web Title : Hantavirus: Symptoms, transmission, and precautions you need to know now.

Web Summary : Hantavirus, spread by rodents, poses a risk through inhalation of contaminated particles. Symptoms include fever and muscle pain, potentially leading to severe respiratory issues. Prevention involves rodent control and careful cleaning. No specific treatment exists; care focuses on managing symptoms.