Join us

राज्यात अवकाळी पावसाचा हैदोस, शेतीपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 09:51 IST

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ठाणे, मुंबईसह विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु असल्याचे चित्र ...

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ठाणे, मुंबईसह विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु असल्याचे चित्र असून नागरिकांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

अवकाळी पावसाने केळीच्या बागांसह ऊस, डाळिंब, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले.  या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानाचे पंचनामे सुरु झाले नसून शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे

सध्या कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार दि.१८ मे पर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण तर कोकणातील ७ जिल्ह्यात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि.१६ मे पर्यंत ढगाळ वातावरणसहित किरकोळ पावसाची असणारी शक्यता आहे. मुंबई सह कोकणातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे पालघर रायगड आजपासुन ३ दिवस म्हणजे गुरुवार दि.१६ मे पर्यंत उष्णतेची लाट तर नव्हे पण उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती व दमटयुक्त उष्णता या ५ जिल्ह्यात जाणवेल, अशी शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :पाऊसहवामान