Join us
Daily Top 2Weekly Top 5

भुईमूग पिकावर पुण्यात मंथन; देशातील १९ राज्यांमधून १५० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 09:57 IST

बैठकीस देशातील १९ राज्यांमधून १५० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. परिषदेत भुईमूग पिकावरील विविध संशोधनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि जुनागढ येथील भारतीय भुईमूग संशोधन संस्थेच्या वतीने पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयात २१ ते २३ एप्रिल दरम्यान अखिल भारतीय समन्वित भुईमूग सुधार प्रकल्पाच्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीचा उद्घाटन सोहळा २१ एप्रिलला होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विलास खर्चे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे दिल्ली येथील उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव आहेत.

सहाय्यक महासंचालक (तेलबिया व कडधान्ये) डॉ. संजीव गुप्ता, जुनागढ येथील संस्थेचे संचालक डॉ. एस. के. बेरा उपस्थित राहणार आहेत.

बैठकीस देशातील १९ राज्यांमधून १५० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. परिषदेत भुईमूग पिकावरील विविध संशोधनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

प्रत्येक राज्यात सुरू असलेल्या संशोधनाचा आढावा घेत सखोल विचारमंथन होणार असून त्यातून राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांसाठी नवीन शिफारशी जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

भुईमुगाच्या प्रगत वाणांच्या प्रसाराला बैठकीत चालना मिळणार आहे. याशिवाय संशोधन अनुभवांचे आदानप्रदान होणार आहे.

अधिक वाचा: यंदा पीक कर्ज मर्यादेत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; वाचा कोणत्या पिकाला एकरी किती मिळणार कर्ज?

English
हिंदी सारांश
Web Title : Peanut crop meet in Pune: Scientists from 19 states to participate.

Web Summary : Pune hosts a national peanut crop meeting, bringing together 150+ scientists from 19 states. Discussions will focus on research, variety improvements, and recommendations for farmers. The event is organized by Mahatma Phule Agricultural University and the Indian Institute of Groundnut Research.
टॅग्स :पीकशेतीपुणेसंशोधनगुजरातविद्यापीठराहुरीविज्ञान