Join us

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये होणार; लवकरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 09:53 IST

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती पुण्यात सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून, त्यांना आर्थिक मदत म्हणून PM Kisan Yojana पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात, तर या योजनेच्या लाभार्थीना राज्य सरकारकडूनही Namo Shetkari Yojana नमो शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत तितकेच, अर्थात सहा हजार रुपये दिले जातात. दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.

शाश्वत शेतीसाठी पारंपरिक शेती आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे. तसेच रसायनांचा वापर टाळून विषमुक्त नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे.

त्या पार्श्वभूमीवर आगामी तीन वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यासाठी राज्य सरकारकडून नैसर्गिक शेती मोहीम राबविण्यात येत आहे. छोट्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडावे यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरीशेतीसरकारराज्य सरकारपंतप्रधानसरकारी योजनासेंद्रिय शेती