Join us

Ginger processing : अद्रकपासून सुंठ बनविण्याकडे कल वाढला; जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:12 IST

Ginger processing : मागील काही दिवसांपासून अद्रकाच्या दरात कमालाची घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. परंतु यावर टेंभुर्णी येथे उपाय म्हणून अद्रकपासून सुंठ तयार करण्याचे दोन प्लांट सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Ginger processing)

नसीम शेख

मागील काही दिवसांपासून अद्रकाच्या दरात कमालाची घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. परंतु यावर टेंभुर्णी येथे उपाय म्हणून अद्रकपासून सुंठ तयार करण्याचे दोन प्लांट सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Ginger processing)

यंदा टेंभुर्णी परिसरात अद्रकचे भाव कमालीचे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही अद्रकचा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. काही व्यावसायिक आता अद्रकपासून सुंठ तयार करण्यास प्राधान्य देत आहेत. (Ginger processing)

टेंभुर्णी परिसरातील टेंभुर्णी - कुंभारारी रस्त्यावर सध्या भरउन्हात सुंठ तयार करण्याचे दोन प्लांट सुरू आहेत. या प्लांटवर मिळून दररोज जवळपास १० टन सुंठ तयार केली जात आहे.(Ginger processing)

या सुंठीच्या व्यवसायामुळे परिसरातील अनेक मजुरांना रोजगार मिळाला असला तरी हे सर्व काम उन्हातच करावे लागते. त्यामुळे या मजुरांना भरउन्हात घाम गाळावा लागत आहे.

सध्या हा परिसर अद्रक आणि सुंठीच्या सुगंधाने दरवळून निघत आहे. अद्रकपासून सुंठ तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवातीला जवळपास २० ते २२ दिवस लागतात.

यानंतर ही प्रक्रिया निरंतर चालू राहात असल्याने दररोज एकीकडे कच्चा माल टाकणे, तर दुसरीकडे तयार झालेली सुंठ पोत्यात भरणे, अशी साखळी चालू राहते. एका प्लांटवर दररोज ५० क्विंटल (पाच टन) सुंठ बनवली जाते.(Ginger processing)

भर उन्हात करावे लागते काम

अद्रकमधील ओलावा कमी होण्यासाठी हे संपूर्ण काम मोकळ्या मैदानावर भर उन्हात करावे लागते. एक क्विंटल अद्रकपासून जवळपास २० किलो सुंठ तयार होते.

एका प्लांटवर रोज ५ टन बनते सुंठ

सध्या ४० ते ५० मजूर काम करत असून, दररोज ५ टनपर्यंत सुंठ तयार केली जाते. त्यामुळे परिसरातील काही मजूरांना रोजगारही मिळाला आहे.

यंदा अद्रकला प्रतिक्विंटल केवळ १,७०० ते १,८०० रुपयांचा भाव आहे. त्यामुळे अद्रकचा व्यवसाय परवडत नाही. ज्यावर्षी अद्रकचे दर खाली पडतात, त्यावर्षी आम्ही अद्रकपासून सुंठ करण्यावर भर देतो. सध्या सुंठीला १५,००० रुपयांचा भाव आहे. शिवाय माल जागेवर एक्सपोर्ट होत असल्याने विक्रीसाठी अधिकचे कष्ट घ्यावे लागत नाहीत.

माझ्या प्लांटवर सध्या ४० ते ५० मजूर काम करत असून, दररोज ५ टनपर्यंत सुंठ तयार केली जाते. हे काम उन्हात करावे लागत असल्याने मजुरांना मजुरीही वाढवून द्यावी लागते. - सतीश वायाळ, सुंठ प्लांट मालक, चिंचखेडा

हे ही वाचा सविस्तर : Akshaya Tritiya Wishes: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पळसाच्या पानांच्या उद्योगाला मिळाली चालना वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीभाज्या