Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या गाळप हंगामासाठी 'गौरी शुगर'चा ऊस दर जाहीर; पहिली उचल किती देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:59 IST

हिरडगाव येथील 'गौरी शुगर'ने यंदाच्या हंगामात आतापर्यंत दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला. देवदैठण येथील युनिट सुरु करण्यात आले असून, 'गौरी शुगर'ने यंदा १० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

श्रीगोंदा : हिरडगाव येथील 'गौरी शुगर'ने यंदाच्या हंगामात आतापर्यंत दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला.

देवदैठण येथील युनिट सुरु करण्यात आले असून, 'गौरी शुगर'ने यंदा १० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यंदाच्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये भाव देणार असून, त्यापैकी पहिला हप्ता ३१०० रुपये काढणार असल्याची माहिती 'ओंकार शुगर ग्रुप'चे संस्थापक बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, की गेल्या वर्षी ३१०६ रुपये भाव व उसाच्या टनाप्रमाणे दिवाळीला मोफत साखर दिली होती. यंदा साखर कामगारांना २० टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला.

हा आर्थिक भार सहन करतानाच 'गौरी शुगर'ने यंदा पहिला हप्ता ३१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, दिवाळीला १०० रुपये व उसाच्या वजनाप्रमाणे मोफत साखर दिली जाणार आहे.

कोण किती भाव देते, याचा विचार 'ओंकार शुगर' करीत नाही. आमची कोणाशीही स्पर्धा नाही. फक्त शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्याचे धोरण असल्याचे बोत्रे पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस देण्याचे आवाहन कार्यकारी संचालक रोहिदास यादव यांनी केले आहे.

अधिक वाचा: उसाला फुटला अवेळी तुरा; आडसाल लावणीच्या वजनाला हेक्टरी १० टनांचा फटका

English
हिंदी सारांश
Web Title : Gauri Sugar Announces Sugarcane Rate; First Installment Details Revealed

Web Summary : Gauri Sugar will pay ₹3200 per ton for sugarcane, with an initial installment of ₹3100. The factory has crushed two lakh metric tons of sugarcane, targeting ten lakh tons this season. Diwali bonus and free sugar based on weight will also be given to farmers.
टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीदिवाळी २०२५श्रीगोंदा