नागपूर : मिहान-सेझा (SEZ) मध्ये पतंजलीच्या (Patanjali) आशियातील सर्वांत मोठ्या फूड आणि हर्बल पार्कचे (food and herbal park) उद्घाटन तब्बल ८ वर्षानंतर ९ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमात मुख्य अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्यासह पतंजली समूहाचे प्रमुख बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचार्य बाळकृष्ण उपस्थित राहतील.
विदर्भातील शेतकऱ्यांची (farmer) आर्थिक समृद्धी आणि रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ स्वतः बाबा रामदेव यांनी जारी केला आहे. कार्यक्रमात सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमासाठी मी ८ तारखेला नागपूरला पोहोचणार असल्याचे व्हिडीओत म्हटले आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांकडून कच्च्या मालाची खरेदी
* रामदेव बाबा (Baba Ramdev) म्हणाले, प्रकल्पात लागणारा बहुतांश कच्चा माल विदर्भातील शेतकरी आणि लगतच्या भागातून खरेदी केला जाईल. प्रकल्पामध्ये फळांच्या रसासोबत इतरही अन्नपदार्थही तयार केले जातील.
* संत्र्याचा रस तयार करण्यासाठी ८०० ते ९०० टन संत्रा लागेल. या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. सेझमध्ये २३२ तर मिहानमध्ये ३२ एकर जमीन
* पतंजली समूहाला विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (SEZ) २३२ एकर आणि मिहानमध्ये ३२ एकर जमीन देण्यात आली आहे.
* कंपनी या जागेवर एक हजाराहून अधिक कोटींची गुंतवणूक करणार आहे. प्रकल्पात टप्प्याटप्प्याने नवीन उत्पादने जोडली जातील.
* विविध उत्पादने एकाच छताखाली तयार करण्यात येणार असल्याने कंपनीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. प्रकल्पामध्ये यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. फ्लोअर मिल सुरू झाली आहे.
१० सप्टेंबर २०१६ ला झाले होते भूमिपूजन
* या प्रकल्पाचे भूमिपूजन १० सप्टेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यावेळी एक हजार ते १२०० कोटींच्या गुंतवणुकीतून विदर्भातील १० हजार युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देण्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केली होती.
* भूमिपूजनाच्या पाच वर्षांनंतरही प्रकल्पात मशिनरीची उभारणी झालेली नव्हती. प्रकल्प सुरू झाल्यानंतर स्थानिक युवकांना रोजगार मिळेल का आणि शेतकऱ्यांचा (Farmer) कच्चा माल कंपनी विकत घेईल का, असे प्रश्न प्रकल्प उशिरा सुरू होत असल्याने उपस्थित झाले आहेत.