छत्रपती संभाजीनगर : पशुधनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला चारा सध्या मोठ्या प्रमाणात टंचाईच्या संकटाला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर "चाऱ्याची टंचाई-आव्हाने आणि उपाययोजना" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे शनिवार (दि.२६) रोजी एम जी एम कृषी विज्ञान केंद्रात आयोजन करण्यात आले होते.
कॉम्पॅक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सीएसआर अंतर्गत सावित्री बाई फुले महिला एकात्म समाज मंडळ कानकोरा (ता.जि छ. संभाजीनगर) व एमजीएम कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने गांधेली येथे पार पडली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक डॉ. कामेश धापके उपस्थित होते. तर या कार्यशाळेत कृविकेंचे प्रमुख काकासाहेब सुकासे यांनी हायड्रोफोनीक्स तंत्रज्ञान, तसेच प्रक्षेत्र व्यवस्थापक बालाजी भोसले यांनी मुरघास तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रीकांत खुपसे यांनी चाऱ्यावार आवश्यक असलेली युरिया प्रक्रिया या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले. दरम्यान कनकोरा येथील शेतकऱ्यांना गांधेली येथील प्रक्षेत्रावर असलेल्या विविध कृषीपूरक प्रकल्पाची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. या वेळी प्रकल्प अधिकारी रतन अंभोरे व डॉ. श्रीकांत खुपसे याचे विशेष सहकार्य लाभले.
हेही वाचा : यंदा जमिनीची नांगरणी करतांना वापरा 'ही' पद्धत; उत्पादन वाढून शेतीला होणार फायदे