कामशेत: मावळमधील कामशेत परिसरात खतांच्या दुकानांमध्ये 'लिंकिंग' मधून शेतकऱ्यांची उघड आर्थिक लूट केली जात आहे.
युरिया खत देताना दुकानदारांकडून इतर खते, सुपला किंवा लिक्विड खते घेणे बंधनकारक आहे, असे सांगून जादा पैसे उकळले जात आहेत.
राज्य शासनाकडून अनुदानित दरात मिळणारा युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नाइलाजाने अनावश्यक खते खरेदी करावी लागत आहेत.
जास्त पैसे न दिल्यास खते देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप केला आहे. अनेक शेतकऱ्यांना खते न मिळताच परत जाते लागत आहे.
काही ठिकाणी खते संपल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवले जात असून, जेथे खते उपलब्ध आहेत तेथे अतिरिक्त पैसे देणे आणि सोबत इतर उत्पादने घेणे सक्तीचे केले जात आहे.
युरिया खत देताना दुकानदारांकडून इतर खते, सुपला किंवा लिक्विड खते घेणे बंधनकारक आहे, असे सांगून जादा पैसे उकळले जात आहेत.
तक्रार घेतली आहे. दुकानदाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. सरकारमान्य दुकानातून खत घेत असाल तर खत घेण्यासाठी लिंकिंग करणे बंधनकारक नाही. असे केल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा. आधार घेऊन नंतर त्याच्या परस्पर त्याच्या नावे परस्पर युरिया खपवण्याचा प्रकार घडला, तर खत विक्री परवाना तात्काळ रद्द होणार आहे. - सूर्यकांत कुंभार, कृषी अधिकारी, मावळ
कामशेत व कडधे येथील सरकारमान्य खताच्या दुकानांमध्ये युरिया खताची मागणी केली असता त्यासोबत सुफला व इतर लिक्विड घेणे बंधनकारक आहे, असे सांगण्यात आले. मात्र, माझी मागणी युरियाची होती. त्यानुसार एका युरियाच्या गोणीमागे प्रति ३०० रुपये घेण्यात आले असून त्याची किंमत २६६ रुपये आहे. शेतकऱ्यांची लूट होत आहे. - ओंकार कडू, बोरज
अधिक वाचा: दुधनी बाजार समितीत तूर व सोयाबीनला हमीभावापेक्षा जादा दर? वाचा काय मिळाला दर?
Web Summary : Farmers in Maval are being forced to buy unwanted fertilizers along with subsidized urea. Shopkeepers are exploiting farmers by linking urea sales with other products, increasing costs. Authorities promise action against those violating regulations.
Web Summary : मावल में किसानों को सब्सिडी वाले यूरिया के साथ अनावश्यक उर्वरक खरीदने के लिए मजबूर किया जा रहा है। दुकानदार यूरिया की बिक्री को अन्य उत्पादों से जोड़कर किसानों का शोषण कर रहे हैं, जिससे लागत बढ़ रही है। अधिकारियों ने नियमों का उल्लंघन करने वालों के खिलाफ कार्रवाई का वादा किया है।