Join us
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीतील वादळात नुकसानग्रस्त ठरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार १६ कोटी; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 16:31 IST

जानेवारी महिन्यात अवकाळी पावसासह वादळात नुकसानग्रस्त ठरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. तब्बल २३ हजार ५६ शेतकऱ्यांना १३ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांच्या नुकसानीपोटी २२ कोटी ५६ लाख ८७ हजारांच्या मदतीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात अवकाळी पावसासह वादळात नुकसानग्रस्त ठरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यातील तब्बल २३ हजार ५६ शेतकऱ्यांना १३ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांच्या नुकसानीपोटी २२ कोटी ५६ लाख ८७हजारांच्या मदतीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १५ हजार ७८६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५ कोटी ७७ लाख ७४ हजारांच्या मदतीची रक्कम लवकरच जमा होणार आहे. जानेवारीत अवकाळी पावसासह वादळाने रब्बी हंगामाचा घास हिरावला होता.

मका, गहू, हरभरा, केळी, ज्वारीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ८८६८ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांची हानी झाली असताना प्रशासनाने बाधितांना मदत मिळावी, यादृष्टीने प्रस्ताव सादर केला होता. त्यात धुळे जिल्ह्यातील ७०९२ शेतकऱ्यांच्या ४६६८ हेक्टरवर पिकांची नासाडी झाली होती.

असे झाले होते नुकसान

• जानेवारी जळगाव जिल्ह्यात बागायत क्षेत्रावरच्या १३ हजार ९८७ शेतकऱ्यांचे ७५९५ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी १२ कोटी २१ लाख २६ हजारांच्या मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

• तर फळ पिकाखालील १९७७ शेतकऱ्यांचे १२७३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यासाठी २ कोटी ८६ लाख ४७ हजार रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार महसूल व वनविभागाने या मदतीच्या रकमेला मंजुरी दिली आहे.

मदतीची रक्कम दृष्टिक्षेपात

क्षेत्र बाधित शेतकरीबाधित क्षेत्र (हे.)मंजूर निधी (लाख)
बागायत१३९८७७५९५.७० १२९१.२६ 
फळपीक १७९९ १२७३.२२ २८६.४७ 
एकूण १५७८६ ८८६८.९२ १५७७.७३ 

तालुकानिहाय बाधित शेतकरी

तालुकाबाधित गावेशेतकरी
जळगाव३४९२४ 
भुसावळ ३७ ७५३ 
यावल३० ६६९ 
रावेर५२ १११३ 
मुक्ताईनगर५० ३४४० 
चोपडा६० ३४४० 
एरंडोल४३ १११३ 
धरणगाव ६८ २९२१ 
पारोळा३९ ११५१ 
चाळीसगाव०६ १८६ 
एकूण ४१९ १५९६४ 

हेही वाचा : शेतं संपून गेली तर माणसं काय खातील? गावोगावी शेतांची भासतेय कमतरता, घरांची मात्र पडतेय भर

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Hit by January Storms to Receive ₹16 Crore Aid

Web Summary : ₹16 crore relief sanctioned for farmers in Jalgaon and Dhule districts affected by January's unseasonal rains and storms. Around 23,056 farmers with 13,537 hectares of damaged crops will benefit, with funds soon deposited in their accounts.
टॅग्स :जळगावशेतकरीशेतीपीकशेती क्षेत्रसरकार