Join us

farmer loan cancelled: शेतकऱ्याला मंजूर झालेले कर्ज अचानक झाले रद्द; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:49 IST

farmer loan cancelled: मंजूर कर्ज रद्द करून शेतकऱ्याला (farmer) अडचणीत टाकल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने बँकेला चपराक दिली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर. (farmer loan cancelled)

यवतमाळमंजूर कर्ज रद्द करून शेतकऱ्याला  (farmer) अडचणीत टाकल्याप्रकरणी ग्राहक आयोगाने बँकेला चपराक दिली आहे. यवतमाळचेशेतकरी अशोक गुलाबचंद भुतडा यांना मंजूर केलेले ८.५० लाख रुपयांचे कर्ज बँकेने वितरीत न करता अचानक रद्द केले. (farmer loan cancelled)

यावर भुतडा यांनी ग्राहक आयोगात धाव घेतल्यानंतर आयोगाने बँकेला संपूर्ण कर्ज रक्कम वितरीत करण्याचा आदेश दिला असून मानसिक त्रास व तक्रार खर्चाची भरपाईही द्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. (farmer loan cancelled)

काय आहे प्रकरण?

* अशोक भुतडा यांनी आपल्या शेतातील विहीर पुनर्बांधणी, सपाटीकरण, सागवान व निलगिरी लागवड यासाठी बँक ऑफ इंडियाच्या दत्त चौक शाखेत कर्जाची मागणी केली होती.

* आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना ८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. कर्ज मंजूरीनंतर भुतडा यांनी स्वतः च्या खर्चाने जवळपास ३.६५ लाख रुपये खर्च करून शेतात काम सुरू केले.

* मात्र, काही दिवसांनी बँकेने कोणतीही स्पष्ट कारणे न देता कर्ज मंजुरी रद्द केल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले.

ग्राहक आयोगाचा काय आहे निर्णय

* शेतकऱ्याने यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे आणि सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत आयोगाने बँकेच्या बाजूने असलेले सर्व युक्तिवाद फेटाळून लावले.

* बँकेने तोंडी सूचना केल्याचा दावा केला पण त्यासंदर्भात कोणताही दस्तऐवज सादर केला गेला नाही.

* आयोगाने आपल्या निर्णयात सांगितले की,  बँकेने ८.५० लाख रुपयांचे कर्ज तातडीने वितरीत करावे. त्याच बरोबर शारीरिक व मानसिक त्रासासाठी २० हजार रुपये तसेच तक्रार खर्चासाठी १० हजार रुपये असा दंड बँकेकडून आकारण्यात आला आहे.

* ही भरपाई ३० दिवसांत न दिल्यास ८ टक्के व्याजासह भरावी लागेल, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी बँकांच्या मनमानी कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कर्ज मंजुरीनंतर त्याचे वितरण न करणे ही गंभीर बाब असून भविष्यात इतर शेतकऱ्यांनीही अशा अन्यायकारक वागणुकीविरोधात कायदेशीर मार्ग अवलंबावा लगेल, असेच या निर्णयातून समजते.

हे ही वाचा सविस्तर : Bank Loan : शेतकऱ्यांना कर्ज देण्यास का आहेत बँका उदासीन; काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक कर्जपीक व्यवस्थापनयवतमाळ