Join us

केळी पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी मुदत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 14:46 IST

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये आंबिया बहार २०२३-२४ साठी केळी पिकामध्ये विमा योजनेत सहभागासाठी अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ हा होता. केळी पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

केळी पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजना बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्षा, ठाणे, हिंगोली, नंदुरबार, नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, यवतमाळ, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर, नाशिक या २७ अधिसूचित जिल्हा, तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळांत लागू आहे.

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता

हवामान धोकेविमा संरक्षित रक्कम रुपये/हेक्टरशेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये/हेक्टर
जास्त तापमान, जादा तापमान, वेगाचा वारा१,४०,०००  ७,००० ते ११,२००
गारपीट४६,६६७  २,३३४

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये आंबिया बहार २०२३-२४ साठी केळी पिकामध्ये विमा योजने सहभागासाठी अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ हा होता. ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ४५,७३१ अर्जदारांनी केळीसाठी विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे.

काही तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत सहभागी विहित वेळेत सहभागी होऊ शकले नाहीत. अशा केळी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घेण्यासाठी ०३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत केंद्र शासनाने मुदतवाढ दिलेली आहे. तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन विमा योजनेत सहभागाबाबत उचित निर्णय घ्यावा.

टॅग्स :पीक विमापीकफलोत्पादनकेळीशेतकरीफळेपंतप्रधान