Join us
Daily Top 2Weekly Top 5

फळपिक विमा व रब्बी पिक विमा योजनेसाठी मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 19:50 IST

आंबा पिक, सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळपिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक ०२-१२-२०२३ अन्वये दिनांक ०४ व ०५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची अतिरिक्त (वाढीव) मुदत वाढ मंजूर केली आहे.

महाराष्ट्र राज्यात विमा योजना अंतर्गत २०२३-२४ मध्ये कोकणातील आंबा आणि सर्व राज्यातील काजू, संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असा होता. मात्र पीक विमा पोर्टल मध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही इच्छुक शेतकरी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले.

सदर शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा या दृष्टिकोनातून कोकणातील आंबा पिक, सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळपिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक ०२-१२-२०२३ अन्वये दिनांक ०४ व ०५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची अतिरिक्त (वाढीव) मुदत वाढ मंजूर केली आहे.

पिकाचे नावविमा योजनेत भाग घेण्याचा नियमित अंतिम दिनांकविमा योजनेत भाग घेण्यासाठी वाढीव मुदत
कोकणातील आंबा३० नोव्हेंबर २०२३०४ व ०५ डिसेंबर २०२३
काजू३० नोव्हेंबर २०२३०४ व ०५ डिसेंबर २०२३
संत्रा३० नोव्हेंबर २०२३०४ व ०५ डिसेंबर २०२३
रब्बी ज्वारी३० नोव्हेंबर २०२३०४ व ०५ डिसेंबर २०२३

आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी वरील फळ पिकांसाठी ०४ व ०५ डिसेंबर २०२३ रोजी विमा योजनेत सहभागी होऊ शकतात. याचा राज्यातील आंबा, काजू, संत्रा व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरीत भागातील आंबा फळ पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२३ असा नियमित आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२३ असा आहे. कृपया याची नोंद घ्यावी.

टॅग्स :पीक विमापीकरब्बीआंबाज्वारीशेतकरीराज्य सरकार