Join us

राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून समृद्ध करा; पणनमंत्र्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 17:47 IST

फूल उत्पादक शेतकरी तसेच कंपन्यांसाठी थेट शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत. यामुळे फूल निर्यातीस चालना मिळेल, अशी सूचना पणन मंत्री तथा राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी केली.

पुणे : फूल उत्पादक शेतकरी तसेच कंपन्यांसाठी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था परिसरात किंवा थेट शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत. यामुळे फूल निर्यातीस चालना मिळेल, अशी सूचना पणन मंत्री तथा राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी केली.

यावेळी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे सचिव तथा कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे संचालक मिलिंद आकरे, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक उपस्थित होते.

रावल म्हणाले, "संस्थेत सहकार विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच सुरू करण्यात येईल. यामुळे संस्थेच्या उत्पन्नवाढीस मोठी चालना मिळेल. नेदरलॅण्ड, इसाईल, जपान व तांझानिया येथील विद्यापीठांचे सहकार्य घेत फूल उत्पादक शेतकऱ्यांकरिता आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, आफ्रिका खंडाअंतर्गत येणाऱ्या देशामधील कृषी विभागाशी संपर्क साधून तेथील शेतकऱ्यांना या संस्थेमध्ये किंवा त्या देशामध्ये जाऊन प्रशिक्षण द्यावे.

इतर राज्यांच्या कृषी, फलोत्पादन विभागांशी संपर्क साधून त्या राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना संस्थेत प्रशिक्षण द्यावे. साखर कारखान्यांना संस्थेचे सभासद करून प्रशिक्षण देण्याच्या सूचना रावल यांनी केल्या.

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी कोल्डप्रेस तेल उद्योग एक सुवर्णसंधी; कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय

टॅग्स :फुलंशेती क्षेत्रशेतकरीशेतीफुलशेतीकृषी योजनाजयकुमार रावल