Join us

राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कृषी व पशुसंवर्धनला पुन्हा नवे सचिव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:29 IST

secretary agriculture maharashtra राज्य सरकारने मंगळवारी आठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. मत्स व्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांची पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव या पदावर बदली करण्यात आली.

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. मत्स व्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांची पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव या पदावर बदली करण्यात आली.

रिचा बागला यांची बदली वित्त विभागाच्या प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली. अंशू सिन्हा वस्त्रोद्योग, सहकार, पणन विभागाच्या नवीन प्रधान सचिव असतील.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे प्रधान सचिव असतील. वित्त विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. हे कृषी विभागाचे नवे सचिव असतील.

अधिकाऱ्याचे नावसध्याचे पदबदलीनंतरचे पद
अतुल पाटणेआयुक्त, मत्सव्यवसायसचिव पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य
रिचा बागलानियुक्तीच्या प्रतीक्षेतप्रधान सचिव वित्त
अंशू सिन्हानियुक्त्तीच्या प्रतीक्षेतप्रधान सचिव वस्त्रोद्योग, सहकार, पणन
नवीन सोनाप्रधान सचिव, सा. आरोग्यउपमुख्यमंत्री शिंदे यांचे प्रधान सचिव
डॉ. रामास्वामी एन.सचिव, वित्तसचिव कृषी, पशुसंवर्धन
वीरेंद्र सिंगसचिव वस्रोद्योगसचिव सा. आरोग्य
प्रदीप पी.नियुक्तीच्या प्रतीक्षेतसीईओ, मेरिटाईम बोर्ड
माणिक गुरसाळसीईओ, मेरिटाईम बोर्डसीईओ, नाशिक विकास प्राधिकरण
टॅग्स :राज्य सरकारसरकारमहाराष्ट्रमंत्रालय