Join us

टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 2:04 PM

असे ओळखा नैसर्गिक आणि केमिकलने पिकविलेले टरबूज

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विविध फळांची मागणी असते. प्रत्येक जण या दिवसामध्ये आवडीने फळे खातात. आंबा, टरबूज, खरबूज ही फळे या कालावधीत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्धसुद्धा असतात. मात्र, ही फळे घेतानाही नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. काही वेळा ही फळे केमिकलद्वारे पिकविली जाते.

विविध फळे विशिष्ट प्रकारच्या रसायनात बुडवून अथवा पावडरद्वारे कच्चे असतानाच ज्याप्रमाणे पिकवली जातात. अगदी टरबूजसुद्धा अनेकवेळा त्याचप्रमाणे पिकविला जातो. त्यामुळे टरबुजातील केमिकल लोचा कसा ओळखावा, असा प्रश्न नागरिकांना पडतो.

बाजारात सहज उपलब्ध होणारे फळे ग्राहक निश्चिंत होऊन खरेदी करतात. काही वेळा फळांची मागणी वाढते. त्यामुळे कच्चे असलेले फळे त्वरित पिकविण्यासाठी विविध प्रयोग केल्या जातात. अनेकवेळा केमिकलचासुद्धा त्यावर वापर केला जातो; मात्र ग्राहकांना यासंदर्भात माहिती पडत नाही.

त्यामुळे ते सहज खरेदी करतात; मात्र अशी फळे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. डिहायड्रेशनची समस्या जाणवते. अशावेळी टरबजू खाणे शारीरिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. टरबुजामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते. 

सध्या बाजारामध्ये २० ते २५ रुपये किलो दराने टरबूज विक्रीस आले आहेत. चंद्रपूर येथे गोल बाजार, गंजवार्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती; तसेच चंद्रपूर नागपूर रोड, बंगाली कॅम्प आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात टरबूज विक्री केली जाते. केमिकलने फळ पिकविले असल्यास अन्न-औषध प्रशासन अशा व्यावसायिकांवर कारवाई करतात. मात्र, या विभागामध्ये कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने काही वेळा त्यांचे दुर्लक्षही होतात.

असे ओळखा टरबूज

टरबजू अधिक लाल असले तर त्याला अधिक किंमत मिळते. ग्राहकांची मागणीही लाल टरबुजलाच अधिक असते. त्यामुळे टरबुजाला लाल करण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. त्याचे सेवन धोकादायक ठरू शकते. केमिकलद्वारे पिकविलेल्या टरबुजाचे देठ हिरवाकंच असतो. तसेच ते टरबूज मऊ असते. अशा टरबुजाला पाण्यात काही वेळ टाकल्यास रंग दिसून येतो. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या टरबुजाचे देठ वाळलेले असते. त्यामुळे ग्राहकांनी टरबूज खरेदी करताना काळजी घ्यावी.

हेही वाचा - गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने

टॅग्स :फळेशेतकरीभाज्यासमर स्पेशल