Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूजलस्तरात वाढ झाल्याने यंदा उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढणार; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:19 IST

भुईमूग हे तीनही हंगामांत घेतले जाणारे तेलबिया पीक आहे. उन्हाळ्यात निरभ्र आकाश व भरपूर सूर्यप्रकाश आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादकताही चांगली राहते. शिवाय यावर्षी भूजलस्तरात वाढ झाल्याने सिंचनासाठी पाणीदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी भुईमुगाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

भुईमूग हे तीनही हंगामांत घेतले जाणारे तेलबिया पीक आहे. उन्हाळ्यात निरभ्र आकाश व भरपूर सूर्यप्रकाश आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने उत्पादकताही चांगली राहते. शिवाय यावर्षी भूजलस्तरात वाढ झाल्याने सिंचनासाठी पाणीदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी भुईमुगाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

भुईमूग या पिकापासून जनावरांना सकस चारा, खाद्यतेल, खाद्य, सकस पेंड व टरफलापासून उत्तम खत मिळत असल्याने हे एक फायदेशीर पीक आहे. भुईमूग लागवडीसाठी मध्यम, परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. ही जमीन भुसभुशीत असल्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रितीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

भारी व चिकणमातीयुक्त जमिनीत आन्ऱ्या खोलवर जात नाहीत. शेंगा पक्त होत नाहीत. तसेच काढणीच्या वेळी ओलावा कमी असल्यास शेंगा जमिनीतच राहून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले. भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच भुईमुगाच्या शेंगा जमिनीत चांगल्या पोसण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत असावी.

जमिनीची खोल (१५ सें.मी.) नांगरट करून घ्यावी. त्यानंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात.  परंतु, उन्हाळी हंगामात भुईमूग लागवडीसाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी हा कालावधी योग्य आहे. वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यानंतर पेरणीस सुरुवात करण्याचे कृषी विभागाचे आवाहन आहे.

वातावरण पोषक असल्याने यंदा लागवड वाढणार

पीकवाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान उपयुक्त असते. बियाणे उगवण, अंकुर व रोप वाढीसाठी जमिनीतील तापमान १५ अंश सेल्सिअस आणि वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक अनुकूल असते. फूलधारणेसाठी वातावरणातील २४ ते २७ अंश सेल्सिअस तापमान मानवते.

तापमानात वाढल्यास शेंगांमध्ये घटीची शक्यता

• वातावरणातील तापमान सतत ३३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास परागकणांच्या सजीव क्षमतेवर विपरीत परिणाम होते. यामुळे भुईमूगाच्या फुलांमध्ये वांझपणा येऊन शेंगधारणा होत नाही, तर जमिनीतील तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसमध्ये शेंगाची वाढ व पोषण चांगले होते. असा शेतकन्यार्टचा अनुभव आहे.

• फूलधारणा ते पक्वता या कालावधीत तापमानात वाढ झाल्यास शेंगांच्या संख्येत घट होते. त्यामुळे आवश्यक खबरदारी व कृषी विभागाचे सल्ल्याने पीक व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. शिवाय वन्य प्राण्यांमुळे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : गणूदादा यांच्या नवीन जुगाड तंत्राने ट्रॅक्टरद्वारे पेरणी केल्यावर दांड पाडणे आता होणार सोपे

English
हिंदी सारांश
Web Title : Increased Groundwater Levels to Boost Summer Groundnut Cultivation This Year

Web Summary : Increased groundwater favors summer groundnut cultivation. Ideal conditions include clear skies, ample sunlight, and fertile soil. Farmers advised to plant between January 15 and February 15 when temperatures are suitable. High temperatures during flowering can reduce yields, requiring careful management and protection from wildlife.
टॅग्स :शेती क्षेत्रपीकशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनबाजार