PF Withdrawal : नोकरी बदलणे, करिअरमध्ये ब्रेक घेणे किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, अशा कारणांसाठी अनेक तरुण कर्मचारी आपला भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) लगेच काढून घेतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते, ही एक मोठी आर्थिक चूक ठरू शकते. पीएफचे पैसे काढण्याऐवजी ते तसेच ठेवल्यास चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा होऊ शकतो.
अनेकांचा असा समज असतो की, नोकरी सोडल्यानंतर पीएफवर व्याज मिळत नाही. परंतु, तुमचे वय ५८ वर्षे होईपर्यंत कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) तुमच्या खात्यावर नियमित व्याज जमा करते. जर तुम्ही वयाच्या ५८ व्या वर्षी नोकरी सोडली, तर त्यानंतर पुढील ३ वर्षापर्यंत व्याज मिळते.
चुका टाळा, रेकॉर्ड तपासा
- एक्झिट डेट : कंपनीने तुमची नोकरी सोडल्याची तारीख (डेट ऑफ एक्झिट) पोर्टलवर अपडेट केली आहे का, हे तपासा.
- केवायसी अपडेट : पॅन, आधार बँक तपशील अद्यायावत ठेवा. त्यामुळे दावा करताना अडचण येणार नाही.
- व्याज जमा झाले का : दरवर्षी जाहीर होणारे व्याज खात्यात जमा होत असल्याची खात्री करा.
- कधी काढता येतील पैसे : वैद्यकीय आणीबाणी, घर खरेदी किंवा मुलांचे शिक्षण यांसारख्या कारणांसाठी पीएफमधून अंशतः पैसे काढण्याची परवानगी आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Don't Withdraw PF After Job Loss; Could Hurt Finances
Web Summary : Withdrawing PF immediately after leaving a job can be a financial mistake. Let the money remain to gain from compound interest. EPFO provides interest until age 58. Keep KYC updated and check your exit date.

Web Title : नौकरी छोड़ने के बाद पीएफ न निकालें; हो सकता है आर्थिक नुकसान
Web Summary : नौकरी छोड़ने के तुरंत बाद पीएफ निकालना एक वित्तीय गलती हो सकती है। चक्रवृद्धि ब्याज का लाभ पाने के लिए पैसे को रहने दें। ईपीएफओ 58 वर्ष की आयु तक ब्याज देता है। केवाईसी अपडेट रखें और अपनी एक्जिट डेट जांचें।