Join us

कोट्यवधींच्या निधीनंतरही या जिल्ह्यात ५३ हजार शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित; कधी मिळणार मदत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:11 IST

Pik Nuksan Bharpai जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या कालावधीत ६५ हजार १९१ शेतकऱ्यांचे २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.

रायगड जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या कालावधीत ६५ हजार १९१ शेतकऱ्यांचे २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.

या नुकसानभरपाईसाठी जिल्हा कृषी विभागाकडे २६ कोटी ७२ लाख ९८ हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. यापैकी १२ हजार १३५ शेतकऱ्यांना ११ कोटी २९ लाख ५३ हजार रुपये निधी वाटप करण्यात आला.

तर, ५३ हजार ५६ शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. खा. धैर्यशील पाटील यांनीही या प्रकाराबाबत खरीप हंगाम आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात अवेळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या शेती, फळबागांचे नुकसान झाले होते.

ऑक्टोबर २०२२, मार्च २०२३, जून, ऑक्टोबर २०२३, नोव्हेंबर, डिसेंबर २०२३, मे २०२४, जुलै २०२४, जुलै, ऑक्टोबर २०२४, ऑगस्ट २०२४, ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ६५ हजार १९१ शेतकऱ्यांच्या २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते, अशी माहिती खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी विभागातर्फे देण्यात आली.

नुकसान झाल्यानंतर कृषी विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने त्यानुसार २६ कोटी ७२ लाख ९८ हजार रुपये निधी कृषी विभागाकडे वर्ग केला.

तो प्राप्त होताच कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वर्ग केला. ६५ हजार १९१ शेतकऱ्यांपैकी फक्त १२ हजार १३५ शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे वर्ग झाले आहेत. ५३ हजार ५६ शेतकरी अनुदान निधीपासून वंचित राहिले आहेत.

६५ हजार १९१ शेतकऱ्यांचे २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. नुकसानभरपाईसाठी जिल्हा कृषी विभागाकडे २६ कोटी ७२ लाख ९८ बाधित झाले होते. या हजार रुपये निधी प्राप्त झाला होता.

२०२३ मधील नुकसानभरपाई नाही- सन २०२३ मधील ३२ हजार ४९३ शेतकऱ्यांचे १२ हजार २२९ शेती, फळबाग हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.- पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविला होता.- त्यानुसार शासनाने १२ कोटी ७१ लाख ५५ हजार रुपये अनुदानाची रक्कम कृषी विभागाकडे पाठवली.- यांपैकी ८ हजार ७९० शेतकऱ्यांना ९ कोटी ३४ लाख ६६ हजार रुपये निधी वाटप करण्यात आला आहे.- २३ हजार ७०३ शेतकऱ्यांचे ३ कोटी ३६ लाख ८९ रुपये शिल्लक असूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नाहीत.

अधिक वाचा: सातबारा होणार आता अधिक स्पष्ट आणि सुटसुटीत, होतायत हे बदल; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीपीक विमापीकखरीपअलिबागरायगडपाऊसराज्य सरकारसरकारपेरणी