Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या दावणीला गावरान गायी दुर्मीळ; संकरित गायी अन् म्हशीची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 11:11 IST

पूर्वीच्या च्या काळी ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या दावणीला गोठ्यात मोठ्या प्रमाणात गावरान गायी दिसून येत होत्या. मात्र आता काळाच्या ओघात गावरान गायींची संख्या दुर्मीळ झाली आहे.

पूर्वीच्या च्या काळी ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या दावणीला गोठ्यात मोठ्या प्रमाणात गावरान गायी दिसून येत होत्या. गायीला हिंदू धर्मात मातेचे स्थान असल्याने शेतकरी गायीला सकाळ- संध्याकाळ नैवेद्य, चारा पाणी करायचे. तसेच दोन वेळा तिचे पूजनदेखील व्हायचे. मात्र आता काळाच्या ओघात गावरान गायींची संख्या दुर्मीळ झाली आहे.

गतकाही वर्षापासून शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसायाकडे वळाले आहे. ज्यामुळे संकरित गाई, म्हशींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुग्ध व्यवसायातून दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले जात आहे. एकावेळी १० लिटर दूध देणाऱ्या संकरित गायी बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे गावरान गायी सांभाळून ३-४ लिटर दुधाचे उत्पन्न घेणे शेतकऱ्यांना जिकीरीचे वाटत आहे. परिणामी गावरान गायींची संख्या कमालीची घटली आहे.

प्रत्येक शेतकऱ्याकडे गावरान संकरित गायी दिसत आहेत. यामुळे गावरान गायीचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे आष्टी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी सांगितले.

पतीच्या व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप

गावरान गायींमुळे वर्षभरात चार एकर शेतीला जीवदान मिळू शकते. गावरान गायीचे गोमूत्र आणि शेणखत शेतीसाठी आयुर्वेदिक औषधी आहे. गायीचे दूध लहान-थोरांसाठी अमृत आहे. त्यामुळे गावरान गायी दावणीला असायला हव्यात. - गजानन कुलकर्णी, व्यवस्थापक, चैतन्य गोशाळा, देवळाली पानाची

हि आहेत गावरान देशी गायींची वैशिष्टे 

देशी गाईंच्या दुधात चरबी अर्थात फॅट आणि एसएनएफचे प्रमाण अधिक आहे. तसेच देशी गाईच्या गोमुत्रापासून शेती उपयोगी विविध अर्क बनविता येतात. सेंद्रिय शेतीत या अर्काना अधिक महत्व आहे. 

टॅग्स :गायशेतीशेतकरीसेंद्रिय शेती