कोल्हापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थ जच्या आहारातील अविभाज्य घटक असला तरी सामान्य ग्राहकांना ते खरेदी करून खाणे अवघड होते. त्यामुळे, जगाचा विचार करता भारतात दुग्धजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आता केंद्र सरकारने जीएसटी कमी केल्याने बाजारात या पदार्थांचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येणार असल्याने रोजचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.
दुधापासून तयार होणारे पनीर, बटर, तूप, चीज, आईस्क्रिम आदी पदार्थांवर ५ ते १८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारली जात होती. त्यामुळे सामान्य माणसाच्या ताटातून हे दुग्धजन्य पदार्थ काहीसे गायब झाले होते. मात्र, या पदार्थावरील जीएसटी कमी करावी, अशी मागणी इंडियन डेअरी असोसिएशनने जीएसटी कौन्सिलकडे केली होती. दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी त्याचा दरावर होणारा परिणाम आणि त्यामुळे तुलनेत कमी होत असलेली विक्री हे असोसिएशनने पटवून दिले होते. त्यानंतर, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जीएसटी दरात दुग्धजन्य पदार्थांवरील कर कमी केला आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
देशातंर्गत खप वाढणारजीएसटी कमी झाल्याने दुग्धजन्य पदार्थांचा देशातंर्गत बाजारपेठेतील खप वाढणार आहे. त्यामुळे दूध संघापुढे निर्यात करण्याची गरजही भासणार नाही. त्याचा प्रत्यक्षात दूध उत्पादन शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दुधापासून तयार होणारे पनीर, बटर, तूप, चीज, आईस्क्रिम आदी पदार्थांवर ५ ते १८% टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारली जात होती. पण हा कर आता कमी करण्यात आला आहे.
अशी झाली जीएसटी कमी(पदार्थ - पूर्वी टक्के - सुधारित टक्के)
- चॉकलेट - १८ - ६
- आईस्क्रीम - १८ - ५
- पनीर - ५ - ०
- बटर - १२ - ५
- तूप - १२ - ५
- चीज - १२ - ५
दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी कमी करावी, यासाठी इंडियन डेअरी असोसिएशन गेली वर्षभर प्रयत्न होते. त्याला यश आले असून यामुळे सामान्य ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त पदार्थ कमी किमतीत खाण्यास मिळणार आहे. त्याचबरोबर या पदार्थांची विक्री वाढल्याने दूध उत्पादनवाढीस आपोआपच प्रोत्साहन मिळणार आहे.- डॉ. चेतन नरके, सदस्य, इंडियन डेअरी असोसिएशन, नवी दिल्ली