दीपक देशमुखसातारा : जिल्ह्यातील गेल्या अडीच महिन्यांपासून ऊस गाळप सुरू असून खासगी व सहकारी मिळून १७ साखर कारखान्यांनी आज अखेर ७८.२२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
तर ७२.८४ लाख क्विंटल साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.३१ असून सहकारी कारखान्यांचा उतारा ११.०२ आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ७२.८४ लाख साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. ऊस गाळपामध्ये खासगी साखर कारखाने पुढे आहेत. मात्र साखर उताऱ्यात हे कारखाने मागे पडले आहेत.
खासगी कारखाऱ्यांनी आतापर्यंत ४४ लाख ६५ हजार ३३० मेट्रिक टन उसाचे गाळप करताना ३५ लाख ८६ लाख ५०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.
सहकारी साखर कारखान्यांनी ३३ लाख ५७ क्विंटल २०५ मेट्रिक टन ऊस गाळप करून ३६ लाख ९६ हजार ९९० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्यांना ११.०२ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
अथणी, अजिंक्यताराच्या उताऱ्यात आघाडीअथणी शुगर्सने ११.६५ टक्के, अजिंक्यतारा साखर कारखान्यानाला ११.९४ टक्के साखर उतारा मिळाला आहे. रेठरे कृष्णा कारखाना आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी (श्रीराम) कारखाना यांचा साखर उतारा ११.५९ टक्के आहे.
कृष्णा, सह्याद्री साखर उत्पादनात पुढेसाखर उत्पादनात कृष्णा आणि सह्याद्री साखर कारखाने पुढे असून, दि. १२ अखेर कृष्णा कारखान्याने १० लाख ७८ हजार ९० तर सह्याद्री कारखान्याने ५ लाख ४६ हजार ९९० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.
कोणत्या कारखान्याचे किती गाळप?कारखाना - मेट्रिक टनअथणी शुगर्स - ३३७१३०जरंडेश्वर शुगर मिल्स - १३३८५६०शरयु अॅग्रो - ४७८२६६जयवंत शुगर्स - ४८७९३६स्वराज (उपळवे) - ४९७८३३अजिंक्यतारा (प्रतापगड) - १४४७००अजिंक्यतारा (शेंद्रे) - ३६७६९०कृष्णा कारखाना - ९३२५५४किसनवीर - ३५६९२०श्रीराम - ३४३५८१खंडाळा म्हावशी - २०९२००दत्त इंडिया - ५५७८१५शिवनेरी शुगर्स - ४७८७७०सह्याद्री - ५०२३००खटाव-माण अॅग्रो - ४२०८४०देसाई कारखाना दौलतनगर - १६३१३०ग्रीन पॉवर शुगर गोपूज - २०५३१०
जिल्ह्यात गाळप हंगाम गतीने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सहकार्य व कामगारांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. गाळपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. सहकारी कारखान्यांचा साखर उताराही अधिक राहणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. - डॉ. सुरेश भोसले, चेअरमन, कृष्णा सहकारी साखर कारखाना
अधिक वाचा: ८६०३२ उसाची कमाल; कराडच्या शेतकऱ्याने अवघ्या २७ गुंठ्यांत काढले ८१ टन ऊस उत्पादन
Web Summary : Satara's sugar factories have crushed 78.22 lakh metric tons of sugarcane, producing 72.84 lakh quintals of sugar. Cooperative factories lead in sugar recovery (11.02%). Athani and Ajinkyatara factories have the highest recovery rates. Krishna factory leads in sugar production.
Web Summary : सतारा की चीनी मिलों ने 78.22 लाख मेट्रिक टन गन्ने की पेराई करके 72.84 लाख क्विंटल चीनी का उत्पादन किया। सहकारी कारखाने चीनी उत्पादन में आगे (11.02%)। अठानी और अजिंक्यतारा कारखानों की दरें सबसे अधिक हैं। कृष्णा कारखाना चीनी उत्पादन में अग्रणी है।