Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर वाढले, आता किती रुपयांना मिळणार गॅस टाकी, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 16:20 IST

Cylinder Prices : गॅस वितरक कंपन्यांच्या माहितीनुसार, ही दरवाढ अलीकडील काळातील सर्वाधिक वाढ मानली जात आहे.

जळगाव : महाराष्ट्र दिनापासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (१९ किलो) दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावात हा दर ९९३ रुपयांनी वाढून ३ हजार ११३ रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅटरिंग व्यवसायावर परिणाम होऊन खाद्यपदार्थ १०-१५ टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. 

तथापि, १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. जळगावमध्ये घरगुती एलपीजी (१४.२ किलो) सिलिंडरची किंमत ९१८.५० आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 

जळगावमध्ये व्यावसायिक एलपीजी (१९ किलो) सिलिंडरची किंमत ९९३ रुपयांच्या वाढीनंतर ३ हजार ११३ रुपये ५० पैसे झाली आहे. गेल्या महिन्यात या सिलिंडरची किंमत २ हजार १२० रुपये ५० पैसे इतकी होती. त्यामुळे नुकतीच झालेली वाढ ही सर्वाधिक असल्याचे गॅस वितरक कंपन्यांचे म्हणणे आहे.

गॅस वितरक कंपन्यांच्या माहितीनुसार, ही दरवाढ अलीकडील काळातील सर्वाधिक वाढ मानली जात आहे. अचानक झालेल्या या मोठ्या वाढीमुळे व्यावसायिक वापरकर्त्यांचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दरम्यान, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जळगावमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत ९१८ रुपये ५० पैसे इतकी कायम आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरवाढीचा प्रवासमार्च २०२६ पासून घरगुती एलपीजीची किंमत ९१८.५० वर स्थिर आहे. गेल्या १२ महिन्यांत, घरगुती एलपीजीच्या किमतीत वाढ होत असून जून २०२५ ते मे २०२६ या काळात ६० रुपयांची वाढ झाली होती.

खाद्यपदार्थांचे दर वाढणारव्यावसायिक एलपीजी हा हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, बेकरी आणि कॅटरिंग व्यवसायासाठी अत्यावश्यक घटक आहे. दरवाढीमुळे या व्यवसायांचा उत्पादन खर्च वाढणार असून, त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या मते, वाढीव खर्च भरून काढण्यासाठी खाद्यपदार्थांच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

छोटे हॉटेल आणि स्टॉलधारक यांच्यावर या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम होईल, कारण त्यांच्याकडे खर्च शोषून घेण्याची क्षमता कमी असते. लग्नसमारंभ, कार्यक्रम यांसाठी कॅटरिंग सेवा देणाऱ्या व्यावसायिकांकडून पॅकेज दर वाढवले जाण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Commercial LPG cylinder prices surge; know the new rates now.

Web Summary : Jalgaon sees a significant hike in commercial LPG cylinder prices, impacting restaurants and catering, potentially raising food costs by 10-15%. Domestic cylinder prices remain stable, offering some relief to households. The increase is noted as the highest in recent times, affecting businesses.
टॅग्स :गॅस सिलेंडरएलपीजी गॅस टंचाईशेती क्षेत्रशेतकरी