PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) २० व्या हप्त्याचे पैसे खात्यात आले आहेत. अनेकांना त्यांच्या फोनवर मॅसेज आला असेल. काहींना मेसेज आला नसेल, म्हणून त्यांनी बँकेच्या नंबरवर मिस्ड कॉल देऊन पैशांची शिल्लक तपासली असेल. जर तुम्हाला अजून माहिती नसेल की तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, तर एक सोपा उपाय आहे.
फार्मर आयडीच्या मदतीने पीएम किसानचे (PM Kisan Status) स्टेट्स जाणून घेता येणार आहे. या स्टेटसच्या मदतीने तुम्ही पीएम किसानचा हप्ता खात्यात आला आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. पीएम किसान योजनेत शेतकरी आयडीच्या मदतीने स्थिती तपासण्याची पद्धत खास आहे.
शेतकरी आयडी वापरून पीएम किसान स्टेटस कसे तपासायचे
- पीएम किसान वेबसाइटला भेट द्या- यासाठी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर जा.
- होम पेजवरील लाभार्थी स्टेटस विभागात जा आणि तुमची स्थिती जाणून घ्या पहा.
- तुम्हाला ते 'फार्मर्स कॉर्नर' अंतर्गत मिळेल.
- नोंदणी क्रमांक निवडा- यासाठी तुम्हाला नोंदणी क्रमांक पर्याय शोधावा लागेल.
- पृष्ठावर एंटर कॅप्चा पर्याय दिसेल जिथे तुम्हाला कॅप्चा कोड टाइप करावा लागेल.
- आता गेट ओटीपी बटणावर क्लिक करा, जेणेकरून तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
- हा ओटीपी पडताळून पाहावा लागेल. मोबाईलवर मिळालेला ओटीपी एंटर करा.
- यासह, तुमच्या पीएम किसानची स्थिती, पेमेंट तपशील स्क्रीनवर दिसतील.