Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाणंद रस्ता कामांवर असलेली दहा कामांची मर्यादा केंद्र सरकार हटवणार; पाणंद रस्त्यांना गती येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 08:47 IST

राज्यात मागील काही महिन्यांपासून एका गावात दहापेक्षा अधिक कामे सुरू करण्यास मर्यादा असल्याने अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे प्रलंबित होती.

ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ आता लवकरच हटवण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

राज्यात मागील काही महिन्यांपासून एका गावात दहापेक्षा अधिक कामे सुरू करण्यास मर्यादा असल्याने अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे प्रलंबित होती.

या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

केंद्रीय मंत्री चौहान यांनी पाणंद रस्त्यांच्या कामांना तातडीने गती देण्यास होकार दर्शवला असून राज्यात लागू असलेली मर्यादा लवकरच पूर्णपणे उठवली जाईल, असे आश्वासन यावेळी  दिले.

या निर्णयामुळे राज्यभर पाणंद रस्त्यांची कामे सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळणार आहे.

शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत जलद आणि  सुरक्षितरित्या पोहोचवता येईल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच गावांच्या दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल.

मातोश्री ग्रामसमृद्धी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असा विश्वास रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा: जिल्हा सहकारी बँकेचे २७०० कोटींचे कर्ज थकीत; राष्ट्रीयकृत बँकांकडूनही थकीत कर्जांची माहिती मागविली

English
हिंदी सारांश
Web Title : Central Government to Remove Limit on Rural Road Works

Web Summary : The central government will remove the ten-work limit on rural road projects under 'NREGA', boosting rural infrastructure. Minister Bharat Gogawale secured approval from Union Minister Shivraj Singh Chouhan, paving the way for smoother rural connectivity and economic growth by facilitating faster, safer transport of agricultural produce.
टॅग्स :सरकारग्रामीण विकासकेंद्र सरकारशिवराज सिंह चौहानमहाराष्ट्र